सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र रेल्वे स्थानकावर एका जर्मन नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमन यादव असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. ‘एएनआय’या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित अमन यादव याने आपण निर्दोष असल्याचं म्हटले आहे. याउलट त्याने जर्मन नागरिकावरच मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मी जर्मन नागरिकाला ‘वेलकम टू इंडिया’ असं म्हणून त्याचं स्वागत केलं, तर यावर त्याने मला ठोसा लगावला. इतकंच नव्हे तर तो माझ्यावर थुंकलाही, असा आरोप यादवने केला आहे. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.