'भाजपात योग्य तो सन्मान मिळत नसेल तर माझ्याकडे या', हार्दिक पटेलचं नितीन पटेलांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 03:46 PM2017-12-30T15:46:53+5:302017-12-30T15:50:52+5:30

गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे.

'If you do not get proper honor in BJP then come to me', invite Harin Patel to Nitin Patel | 'भाजपात योग्य तो सन्मान मिळत नसेल तर माझ्याकडे या', हार्दिक पटेलचं नितीन पटेलांना आमंत्रण

'भाजपात योग्य तो सन्मान मिळत नसेल तर माझ्याकडे या', हार्दिक पटेलचं नितीन पटेलांना आमंत्रण

Next
ठळक मुद्देटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहेखातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे 'जर ते पक्ष सोडायला तयार असतील, आणि त्यांच्यासोबत 10 आमदार सोबत येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत'

अहमदाबाद - गुजरातमध्ये सत्ता आल्यानंतर भाजपामध्ये राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. 'भारतीय जनता पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्याला योग्य तो मान देत नसून, प्रत्येकाने त्यांच्यासोबत उभं राहण्याची गरज आहे', हार्दिक पटेल म्हणाला आहे. 

गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला पण उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मात्र अजूनही आपल्या खात्याची सूत्र स्वीकारलेली नाहीत. नितीन पटेल अजूनही गांधीनगर सचिवालयाकडे फिरकलेले नाहीत. 

अर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्याने नितीन पटेल नाराज असल्याचे समजते. उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच गुजरात सरकारमधील महत्व कमी करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नितीन पटेल यांनी यावेळी विजय रुपाणींकडे अर्थ आणि शहर विकास ही दोन खाती  मागितली होती अशी माहिती आहे. नितीन पटेल यांचे सरकारमधील महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयाने व्यक्त केली. 

'जर भाजपा योग्य तो मान देत नसेल तर नितीन पटेल आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे', असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने हे वक्तव्य केलं. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'जर ते पक्ष सोडायला तयार असतील, आणि त्यांच्यासोबत 10 आमदार सोबत येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. त्यांच्या स्वागतासाठी मी काँग्रेस पक्षाशी बोलेन आणि त्यांना योग्य ते पद देईन'.

काँग्रेस प्रदेशाध्य़क्ष भरतसिंह सोलंकी यांनी आपण परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं सांगितलं आहे. 'काँग्रेस परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर नितीन पटेल यांना टार्गेट केलं जात आहे'. जर आम्हाला नितीन पटेल आणि काही आमदारांचा पाठिंबा मिळाला तर लोकांच्या हितासाठी सरकार स्थापना करु असं भरतसिंह सोलंकी बोलले आहेत. 

यावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. यावेळी सुद्धा ते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते.  पटेल आरक्षणाची मागणी आणि पटेल मतदारांची नाराजी लक्षात घेता त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता होती. पण पक्ष नेतृत्वाने विजय रुपाणी यांच्यावरच विश्वास दाखवला. विजय रुपाणी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

मागच्यावर्षी 2016 मध्ये आनंदीबेन पटेल मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर नितीन पटेल यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. तेच गुजरातचे पुढचे मुख्यमंत्री अशा बातम्याही माध्यमांनी चालवल्या होत्या. पण अखेरच्या क्षणी विजय रुपाणी मुख्यमंत्री झाले. 

Web Title: 'If you do not get proper honor in BJP then come to me', invite Harin Patel to Nitin Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.