If you come to power, please copy the NEET test, the declaration of the MLA | सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा
सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा

तिरुअनंतपुरम : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात. अशीच घटना तामिळनाडूमध्ये पाहायला मिळत आहे. येथे माजी मंत्री आणि डीएमके पक्षाचे आमदार के.एन.नेहरू यांनी सत्तेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करू दिली जाईल अशी घोषणा केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी करणा-या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नेहरू यांनी ही घोषणा केली. जर NEET परिक्षेतून सूट मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो तर आमचं सरकार आल्यास आम्ही विद्यार्थ्यांना खुलेआम कॉपी करण्यास परवानगी देऊ असं नेहरू म्हणाले. तुम्ही बिहार-मध्य प्रदेशमध्ये खुलेआम कॉपी करू देतात, असं का? केवळ तमिळ लोकं कधीपर्यंत इमानदार राहतील असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना विचारला.  वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
काय आहे प्रकरण-
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी  तामिळनाडूचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. अनेक दिवसांपासून हा मुद्या येथे चर्चेत अशून राज्यातील विविध भागांत त्यासाठी विरोध प्रदर्शनं देखील सुरू आहेत.  

सध्या तामिळनाडूत एआयडीएमकेचं सरकार असून डीएमके तेथे विरोधी पक्ष आहे.  

Web Title: If you come to power, please copy the NEET test, the declaration of the MLA
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

विद्यापीठ उन्हाळी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

विद्यापीठ उन्हाळी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

16 minutes ago

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

19 hours ago

इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, कृतिपत्रिका आराखडा

इयत्ता दहावी- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, कृतिपत्रिका आराखडा

1 day ago

५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत!

५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत!

1 day ago

नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी

नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी

1 day ago

राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज 

राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज 

1 day ago

प्रमोटेड बातम्या

राष्ट्रीय अधिक बातम्या

'बाबूभय्या'ची बातच न्यारी, भल्या-भल्या केसेस सोडवते भावा-बहिणीची जोडी

'बाबूभय्या'ची बातच न्यारी, भल्या-भल्या केसेस सोडवते भावा-बहिणीची जोडी

37 minutes ago

देवबंदमधून 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित दहशतवाद्यांना अटक, उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई

देवबंदमधून 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित दहशतवाद्यांना अटक, उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई

1 hour ago

पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट; शशी थरुरांचे तर्कट

पाकिस्तानशी न खेळणं म्हणजे त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्याहून वाईट; शशी थरुरांचे तर्कट

1 hour ago

सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

2 hours ago

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, रुग्णालय अन् लष्कराला सज्जतेचे आदेश

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, रुग्णालय अन् लष्कराला सज्जतेचे आदेश

2 hours ago

भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले

भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले

2 hours ago