मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:46 PM2019-04-12T20:46:46+5:302019-04-12T20:47:23+5:30

१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही

If Narendra Modi takes credit for 'surgical', then there is nothing wrong with it - Major General G. D. Bakshi | मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

Next

 जळगाव - १९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही,  असे मत  सैन्याचे निवृत्त मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी व्यक्त केले. 

 एका कार्यक्रमानिमित्त बक्षी हे शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी जळगाव जनता बॅँकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  सर्जिकल स्ट्राईक असो वा युध्द या सर्व कारवाईसाठी पंतप्रधानांकडूनच परवानगी दिली जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यासाठी हिंमत दाखविणाºया कोणत्याही शासनाला श्रेय हे नक्कीच दिले पाहिंजे.
 राफेलमध्ये नोकरशाह व काही राजकारण्यांना यामध्ये पैसा मिळाला नाही म्हणून राफेलचा वाद निर्माण केला जात आहे.  हा वाद पाकिस्तान व चीन सारख्या शत्रू देशांसाठी लाभदायक ठरत असल्याचे ते म्हणाले. 



  सन  १९७१ नंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले नव्हते.  सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले.त्याचवेळी पाकिस्तानला ठेचण्याची गरज होती. तेव्हा संधी गमावली नंतर पुलवामा घडल्यानंतर एअर स्ट्राईकव्दारे उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवित असतानाच देशातील कबुतरं उडवणाºया गॅँगने युध्द नको अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या नांग्या ठेचत्या आल्या नाहीत. भविष्यात देखील या गॅँगकडून देशाला धोका असल्याचे बक्षी म्हणाले. 

Web Title: If Narendra Modi takes credit for 'surgical', then there is nothing wrong with it - Major General G. D. Bakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.