मोदी कॅबिनेटमध्ये अमित शहांची वर्णी लागल्यास कोण होणार भाजपा अध्यक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 09:18 AM2019-05-28T09:18:52+5:302019-05-28T09:21:07+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा निवडून आले आहेत.

if amit shah gets ministry in modi cabinet so jp nadda or dharmendra pradhan may be elected as new bjp president | मोदी कॅबिनेटमध्ये अमित शहांची वर्णी लागल्यास कोण होणार भाजपा अध्यक्ष?

मोदी कॅबिनेटमध्ये अमित शहांची वर्णी लागल्यास कोण होणार भाजपा अध्यक्ष?

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीनरेंद्र मोदी सरकारमध्ये वर्णी लागल्यास त्यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी दिली जाईल. तसेच, अमित शहा यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.  

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा निवडून आले आहेत. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळातील स्थान मिळणार की नाही, याबाबत कळून येणार आहे. तसेच, मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नवीन चेहरे दिसून येणार आहेत. 

अमित शहा यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यास त्यांना भाजपाचे अध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. कारण, भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की, अमित शहा यांनी पार्टीचे अध्यक्ष पद सोडल्यास त्यांच्या जागी जेपी नड्डा किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पार्टीची धुरा सोपविली जाईल.  दरम्यान, अमित शहा यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पार्टीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी कोणाला आणायचे, हे पार्टीसाठी मोठे अवघड काम आहे. अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पार्टीने सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये विजयाची मोहर उमटवली आहे. अमित शहांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या महानगरपालिका, विधानसभा निवडणुकांपासून लोकसभा निवडणुकांपर्यंत भाजपाने रेकॉर्डतोड प्रदर्शन केले आहे. 

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांने सांगितले की, 'अमित शहा यांनी जे यश मिळविले आहे. ते कोणत्याही दुसऱ्या अध्यक्षाला मिळविणे कठीण आहे.' याशिवाय, पार्टीमध्ये अशीही चर्चा रंगू लागली आहे की, अमित शहा यांचा मोदी सरकारमध्ये समावेश केला जाणार, असून त्यांच्याकडे मंत्रीमंडळातील महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. तर, अरुण जेटली यांनी तब्येतीच्या कारणामुळे आराम केला, तर अमित शहा यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाईल.  

Web Title: if amit shah gets ministry in modi cabinet so jp nadda or dharmendra pradhan may be elected as new bjp president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.