Ib and raw bursted delhi preplanned terrorist attack; arrested afgani businessman's son | दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट आयबी, रॉने उधळला; अफगाणिस्तानातील बड्या उद्योगपतीच्या मुलास अटक  
दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट आयबी, रॉने उधळला; अफगाणिस्तानातील बड्या उद्योगपतीच्या मुलास अटक  

नवी दिल्ली - भारतीय गुप्तचर यंत्रणांनी (आयबी) दिल्लीत होणारा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला असून इसिसच्या दहशतवाद्याला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुण अफगाणिस्तानातील एका बड्या उद्योगपतीचा ३० वर्षीय मुलगा असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. 

रॉने इसिसच्या माहितीच्या देवाण-घेवाण यंत्रणेत शिरकाव केला. सुमारे १८ महिने अफगाणिस्तान, दुबई आणि नवी दिल्लीत ही मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत इसिसला येणारे किंवा केले जाणारे फोन, बँकेचे व्यवहार हे ट्रेस करत त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली. या १८ महिन्यांच्या कष्टाचं  रॉच्या हाती महत्वपूर्व माहिती लागल्यानंतर चीज झालं. या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इसिसचे १२ दहशतवादी प्रमुख शहरांवर आत्मघाती हल्ले करणार होते. त्यासाठी त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात येत होतं. त्याचप्रमाणे दुबईतून अफगाणिस्तानमध्ये ५० हजार डॉलर्सचा व्यवहार झाल्याचंही निष्पन्न झालं आहे. या व्यवहाराचा माग काढत असताना अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी रॉला संभावित हल्ल्यांसाठीच्या शहरांमध्ये नवी दिल्लीचा समावेश असल्याची माहिती दिली. दिल्लीत हल्ला करण्यासाठी एका श्रीमंत अफगाणी व्यापाऱ्याच्या मुलाची निवड करण्यात आली होती.

रॉला या तरुणाचं वर्णनही कळलं होतं. त्यानुसार दहशतवादी दिल्लीला आल्यानंतर रॉने एका एजंटच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. एजंटने त्याच्याशी मैत्री केली. मात्र, हा एजंट रॉचा माणूस असल्याची तसूभरही कल्पना त्या दहशतवाद्याला नव्हती. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी  एका खासगी इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. सुरुवातीला तो हॉस्टेलवर राहत होता. नंतर त्याने फरिदाबादजवळील लाजपत नगर येथे एक स्वतंत्र खोली भाड्याने घेतली. एजंटनेच त्याला घर मिळवून दिलं. जेणेकरून त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. नवीन घरात राहायला गेलेल्या दहशतवाद्याच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी रॉने ८० जणांचे पथक नेमला होते. त्यानुसार, त्याच्या प्रत्येक हालचालीचा माग काढत हल्ल्याचा दिवस आणि वेळही शोधली गेली.  हल्ल्याच्या तयारीत असलेल्या या दहशतवाद्याच्या रॉने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून २२ मे २०१७ रोजी लंडन येथील मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटांमागे इसिसचा हात असल्याचा रॉचा अंदाज आहे. कारण, दिल्ली येथील हल्ल्यांसाठी जी विस्फोटकं दहशतवाद्याने मागवली होती, तशाच प्रकारची विस्फोटकं मॅन्चेस्टर स्फोटातही वापरली गेली होती. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबानी तळांवर हल्ले केले होते असे देखील अटक दहशतवाद्याने सांगितले. 

 


Web Title: Ib and raw bursted delhi preplanned terrorist attack; arrested afgani businessman's son
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.