'मी अंधारात लढाई लढतोय'; मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या अधिकाऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 07:42 AM2019-04-27T07:42:25+5:302019-04-27T07:43:03+5:30

गेल्या आठवड्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.

'I am fighting in the dark'; Modi's helicopter investigating officer's reaction | 'मी अंधारात लढाई लढतोय'; मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या अधिकाऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया

'मी अंधारात लढाई लढतोय'; मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या अधिकाऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया

Next

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यावर उद्विग्न झालेल्या या अधिकाऱ्याने मी माझे कर्तव्य पार पाडत होतो. मात्र, निलंबित करण्यात आले, याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. 


गेल्या आठवड्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांच्यावर एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि निलंबन करण्यात आले. 

केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्यूनलकडून गुरुवारी मोहसिन यांच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात नियम मोडल्याबद्दल कारवाई करण्याची सूचना केली आहे. 
यावर प्रतिक्रिया देताना मोहसिन यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले की, ''मी माझे काम करत असतानाही मला निलंबित करण्यात आले. या संबंधातील एकही अहवाल मला देण्यात आला नाही. मी अंधारात लढाई लढत आहे.''


 

विरोधी पक्षांचा आरोप
विरोधी पक्षांनी असा कोणताही नियम नसल्याचा आरोप केला आहे. निवडणूक काळात अशा प्रकारे कोणाची तपासणी करू शकत नाही असा कोणताही नियम नाही. या तपासणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 मिनिटे उशिर झाला होता. 
मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते. 

Web Title: 'I am fighting in the dark'; Modi's helicopter investigating officer's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.