ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 12 - बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू यांचे गठबंधन अतूट असल्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहार राजकरणाला नवे वळण मिळाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांनी आज नितिश कुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आपल्यावरील आरोपाचं खंडण करत केंद्र सरकरवर निशाना साधला आहे. ते म्हणाले, माझ्यावर झालेले स्रव आरोप 2004 मधील आहेत. त्यावेली 12-13 वर्षांचा असेल. त्यावेळी मला मिशा देखील आल्या नव्हत्या. ज्या मुलाला मिशा फुटल्या नाहीत तो  भ्रष्टाचार कसा करेल. यावेळी त्यांनी केंद्र सरकर आपल्याला घाबरल्याचा दावाही केला.
भाजपाने लालू प्रसाद यादव परिवाराला नाही तर संपूर्ण बिहारला बदनाम करण्याचा कट केला आहे. आम्ही गरिबाविषयी प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यांविषयी बोललो. पंतप्रधानांनी केलेल्या आश्वासनावर आम्ही बोललो. आम्ही मागासवर्गीय कुटुंबतील असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.

 

लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर सीबीआयने छापे घेतल्यापासून तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढावे, यासाठी नितीशकुमार यांच्यावर स्वपक्षीयांकडून दबाव वाढत आहे. दुसरीकडे तेजस्वीप्रसाद राजीनामा देणार नाहीत, असा निर्णय राजदच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळात ठेवणे, याचा अर्थ भ्रष्टाचारास पाठिंबा देणे होईल, असे जनता दल (युनायटेड) च्या मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे.
सीबीआयने मागच्याच आठवडयात हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता.