पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 06:04 PM2017-10-06T18:04:02+5:302017-10-06T18:07:26+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कारप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरात उळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासा समोर आला  आहे. 

Honeypreet gave one crore fifty million rupees to inflict violence in Panchkula! | पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख !

पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख !

Next
ठळक मुद्देउळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासाहिंसाचार भडकविण्यासाठी 1.25 कोटीडेरा सच्चा सौदाच्या सदस्यांना नोटीस

पंचकुला : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कारप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरात उळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासा समोर आला  आहे. 
गुरमीत राम रहीम याची मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्यावर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी केला असून याप्रकरणी तिला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने हिंसाचार भडकविण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये दिल्याचे उघड झाले आहे. पंचकुलामधील नाम चर्चा घरचे प्रमुख चमकौर सिंहने याबाबत खुलासा केला आहे. डे-यामध्ये 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीनंतर हनीप्रीतने चमकौर यांना पैसे पाठविले होते. दुसरीकडे, पोलिसांनी डेरा सच्चा सौदाच्या 45 सदस्य असलेल्या व्यवस्थापन कमिटीला नोटीस पाठविली आहे. तसेच, त्यांना चौकशीमध्ये सहभागी होण्याचे निर्देष दिले आहेत. या 45 सदस्यांनी हिंसाचार भडकविण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. 
पंचकुलामध्ये 25 ऑगस्टला राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हिंसाचारादरम्यान, जमावाने 100 हून अधिक गाड्यांना आग लावली होती आणि मीडियावर हल्ला केला होता. 
हनीप्रीतने राम रहीमची पोलीस स्टेशनमधून सुटका करण्यासाठी अशाप्रकारे षडयंत्र रचले होते. मात्र हे षडयंत्र पोलिसांनी मोडून काढले. दरम्यान, याप्रकरणी हनीप्रीत विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला जवळपास 38 दिवसानंतर अटक केली आहे. 
पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हनीप्रीतने दावा केला आहे की, ती नेपाळला गेली नव्हती. पंजाबच्या भटिंडामधील एका डेरा समर्थकाच्या घरात मी लपली होती. हरियाणा पोलिसांना सुरूवातीच्या चौकशीत यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही. हनीप्रीत भटिंडामध्ये असल्याची माहिती पोलिसांना सुखदीप नावाच्या एका महिलेकडून समजली होती. सुखदीप डेऱ्याची अनुयायी आहे. तिचं कुटुंब डेऱ्यामध्येच राहते. भटिंडामध्ये सुखदीपची जमीन आणि घर आहे. त्याठिकाणी सुखदीप 2 सप्टेंबरनंतर राहायला गेली होती. हनीप्रीतची पंचकुलाच्या चंडीमंदिर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 5 तास सुनावणी झाली. पंचकुलाचे पोलीस अधिकारी एएस चावला यांनी हनीप्रीतची चौकशी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. चौकशीच्या सुरूवातीपासून हनीप्रीत जास्त माहिती देत नाहीये. पण तिची चौकशी सुरूच राहणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर हनीप्रीतला पोलीस रिमांडमध्ये घेतले जाणार आहे. हनीप्रीत गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडेच राहत होती, असे हनीप्रीतबरोबर अटक केलेल्या महिलाने चौकशीदरम्यान सांगितले आहे. 

Web Title: Honeypreet gave one crore fifty million rupees to inflict violence in Panchkula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.