'Honey Trap' stuck in airplane; Confidential Information to Pakistan | ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी; पाकिस्तानला देत होता गोपनीय माहिती

नवी दिल्ली : इंटर स्टेट इंटलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली. हवाई दलाच्या मुख्यालयातून अरुण मारवाह त्यांच्या मोबाइलद्वारे अत्यंत हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन आयएसआयला पाठवित होते, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी दिली.
अरुण मारवाह यांच्या गेल्या काही दिवसांतील हालचालींविषयी शंका आल्याने, हवाई दलाच्या गुप्तचर अधिकाºयांनी त्यांना ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. अरुण मारवाह (वय ५१ वर्षे) यांना आयएसआयने फेसबुकद्वारे ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढले होते, असे असे सूत्रांनी सांगितले. आपण मॉडेल्स असल्याचे भासवून आयएआयच्या एजंट्सनी त्यांना भुरळ घातली होती.

आर्थिक देवाण-घेवाण नाही?
मात्र, या प्रकरणात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. केवळ लैंगिंक संबंधांविषयीच्या संदेशांच्या बदल्यात हा अधिकारी युद्धसरावत, तसेच युद्धाशी संबंधित लढाऊ विमानांची माहिती देत होता. या अधिकाºयामुळेच ‘गगन शक्ती’ या हवाई दलाच्या सरावाची माहितीही पाकिस्तानला मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे
मारवाहला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या लोधी कॉलनीत त्याची चौकशी सुरू आहे.गुप्तचर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला असून, तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. या अधिका-याचे पोस्टिंग हवाई दलाच्या मुख्यालयात होते. तेथून आपणाला ही सारी माहिती मिळाली, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली, असे कळते.
मारवाह यांना आठवडाभर लैंगिक भावना उत्तेजित करणारे, तसेच अश्लील संदेश मॉडेल्सच्या नावाखाली आयएसआयचे एजंट्स पाठवित होते. त्यानंतर, त्यांनी मारवाह यांच्याकडून हवाई दलाच्या युद्धसरावाची माहिती मागितली आणि त्यांनी ती माहिती फोटोंसह व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविली, असे उघड झाले आहे.


Web Title: 'Honey Trap' stuck in airplane; Confidential Information to Pakistan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.