गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 05:51 PM2018-03-02T17:51:48+5:302018-03-02T17:51:48+5:30

या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

Holi is not celebrated in the last 100 years in this village ... due to this Chakit will be reading | गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

googlenewsNext

नवी दिल्ली -  वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी देशभरात होळी साजरी केली जाते. आजच्या दिवशी होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. पण भारतात अशी काही ठिकणे आहेत की तिथे वर्षानुवर्षे होळी साजरी केली जात नाही. कुठे साधूच्या शापामुळं तर कुठे महामारीमुळं काही ठिकाणी राजाचे भूत असल्यामुळं होळी साजरी केली जात नाही. 

झारखंड राज्यातील बोकारो येथील कसमार ब्लॉक स्थित दुर्गापूर गावात गेली 100 वर्षांपासून होळीच साजरी केली नाही. या गावची लोकसंख्या 9 हजार आहे.  होळी साजरी केली तर गावात महामारीसारखा आजार पसरेल आणि गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळेल, या भीतीच्या सावटाखाली हे गाव आजही वावरत आहे. 

येथील लोकांच्या मनातील भीतीला आणि या अंद्धश्रेद्देला खतपाणी घालणारी दंतकथा आहे.  साधारण एक दशकापूर्वी दुर्गापूर गावात राजा दुर्गाप्रसाद यांचे राज्य होते. त्यांना होळी सण आवडायचा. मात्र एका वर्षी होळीच्या दिवशीच राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर या गावातील लोकांनी कधीच होळी साजरी करू नये, असा आदेशच आपल्या मृत्यूपूर्वी राजाने दिला होता. योगायोगाने राजाचा मृत्यू एका युद्धात झाला, तोही होळीच्याच दिवशी. आणि तेव्हापासून या गावात आजही होळी साजरी केली जात नाही.
 

Web Title: Holi is not celebrated in the last 100 years in this village ... due to this Chakit will be reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.