सहा वर्षांनी पाकमधून सुटताच प्रेमवेड्या हमीदचे भारतभूमीला वंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:01 AM2018-12-19T06:01:36+5:302018-12-19T06:03:19+5:30

अमृतसर : समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा ...

Hmmid's Bharat Bhoomla greeted with love after six years | सहा वर्षांनी पाकमधून सुटताच प्रेमवेड्या हमीदचे भारतभूमीला वंदन

सहा वर्षांनी पाकमधून सुटताच प्रेमवेड्या हमीदचे भारतभूमीला वंदन

अमृतसर : समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा वर्षांनी मुक्तता करण्यात आली. त्याला पाकिस्तानने मंगळवारी संध्याकाळी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले.

त्यावेळी त्याचे वडील निहाल, आई फौजिया व हमीदच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जतीन देसाई असे सारेच भावूक झाले होते. जतीन देसाई यांनी लोकमतला सांगितले की, हमीदने भारतीय हद्दीत प्रवेश (पान ११ वर)

बीटिंग द रिट्रीटनंतर ताबा
वाघा सीमेवर भारत व पाकिस्तानी लष्करामध्ये दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. त्यावेळी दोन्ही बाजूला काही हजार प्रेक्षक तिथे जमा झालेले असतात. हा सोहळा संपल्यानंतर हमीद याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले.
 

Web Title: Hmmid's Bharat Bhoomla greeted with love after six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.