हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:37 AM2018-08-30T09:37:28+5:302018-08-30T09:49:00+5:30

पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा हिज्बुल मुज्जाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे

Hizbul Mujahideen's leader Syed Salahuddin's son arrested | हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक 

हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक 

Next

श्रीनगर - पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा हिज्बुल मुज्जाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सय्यद सलाउद्दीनचा मुलगा शकील याला एनआयए, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. 

सलाहुद्दीनचा मुलगा शकील याला श्रीनगरमधील रामबाग परिसरातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.  दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपाखाली शकील याला अटक करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमामधून सांगण्यात येत आहे. मात्र तपास यंत्रणांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  




शकील हा पेशाने लॅब टेक्निशियन आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी सय्यद सलाउद्दीनचा अजून एक मुलगा अटकेत आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सय्यद शाहिद युसूफ याला अटक करण्यात आली होती. 2011 साली दहशतवाद्यांना झालेल्या वित्तपुरवठ्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या सय्यद सलाउद्दीनकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. 

Web Title: Hizbul Mujahideen's leader Syed Salahuddin's son arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.