संसदेत आला हिटलर! पाहून सर्वांनाच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 12:41 PM2018-08-09T12:41:43+5:302018-08-09T12:42:16+5:30

दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली तरी आपल्या नजरेसमोर त्याचे क्रौर्य येते. पण आज चक्क हिटलर भारतीय संसदेच्या आवारात अवतरला आणि सर्वांनाच धक्का बसला.

Hitler came into the Indian Parliament! Everyone stumbles on seeing this | संसदेत आला हिटलर! पाहून सर्वांनाच बसला धक्का

संसदेत आला हिटलर! पाहून सर्वांनाच बसला धक्का

Next

नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली तरी आपल्या नजरेसमोर दुसऱ्या महायुद्धातील संहार आणि त्याने ज्यू नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार येतात. पण आज चक्क हिटलर भारतीयसंसदेच्या आवारात अवतरला आणि सर्वांनाच धक्का बसला. पण हा कुणी खराखुरा हिटलर नव्हता तर चित्रविचित्र वेशभूषा करून संसदेत येण्यासाठी प्रसिद्ध असलेले तेलुगू देसमचे खासदार एन. शिवकुमार हे हिटलरचा वेश धारण करून संसदेत आले. तेलुगू देसम पक्ष आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करत आहे. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवकुमार हे असा वेश धारण करून संसदेत आले. 





याआधी शिवकुमार हे आंध्र प्रदेशची ओळख असलेली पारंपरिक साडी नेसून संसदेत आले होते. तसेच विद्यार्थी, नारद मुनी अशा वेशभूषा करूनहीय त्यांनी सातत्याने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ते नारद मुनी, तांत्रिक आणि महिलेची वेशभूषा करून ते संसदेत आले होते. एकदा तर काळ्या पैशाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ते अर्धे पांढके आणि अर्धे काळे शर्ट परिधान करून संसदेत आले होते. 

 एन. शिवप्रसाद हे राजकारणात उतरण्यापूर्वी अभिनय क्षेत्रात होते. त्यांचे नाव आंध्र प्रदेशमधील चर्चित अभिनेत्यांमध्ये समाविष्ट आहे.   

Web Title: Hitler came into the Indian Parliament! Everyone stumbles on seeing this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.