'इतिहास गवाह है'... कर्नाटकात जे जिंकतात, ते केंद्रात हरतात

By बाळकृष्ण परब | Published: May 2, 2018 04:21 PM2018-05-02T16:21:06+5:302018-05-02T16:24:00+5:30

केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी पाहिली तर या दोन्ही पक्षांना कर्नाटकमध्ये जिंकणे फारसे आवडणार नाही.  

 'History is a witness' ... who wins in Karnataka, they lose In Lok sabha Election | 'इतिहास गवाह है'... कर्नाटकात जे जिंकतात, ते केंद्रात हरतात

'इतिहास गवाह है'... कर्नाटकात जे जिंकतात, ते केंद्रात हरतात

Next

मुंबई  - कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता ऐन बहरात आला आहे. सत्ताधारी काँग्रेससह, भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी कर्नाटकचे तख्त हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान देवेगौडा असे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. विशेषत: केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी पाहिली तर या दोन्ही पक्षांना कर्नाटकमध्ये जिंकणे फारसे आवडणार नाही.  या आकडेवारीनुसार 1999 पासून कर्नाटक विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरणारा पक्ष त्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हमखास पराभूत होतो. असे दिसून आले आहे.आता यावर विश्वास बसत नसेल तर 1999 पासून झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काढू पाहा. 

1999 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  या आकडेवारीनुसार  1999 साली झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 132 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. पण त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपाने केंद्रात सत्ता स्थापन केली होती. 

 2004 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  त्यानंतर 2004 साली कर्नाटकमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या. त्यावेळी त्रिशंकू विधानसभेत भारतीय जनता पक्ष 79 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन भाजपाला सत्ता गमवावी लागली. नंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने राज्यातही भाजपाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. मात्र काही वर्षांनी काँग्रेसचे सरकार पडल्यावर भाजपा आणि जनता दल सेक्युलरने एकत्र येत सरकार स्थापन केले. 

2009 कर्नाटक विधानसभा निवडणूक - भाजपा आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सरकार चालवण्यावरून झालेल्या वादानंतर 2008 साली कर्नाटकमध्ये विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने 110 जिंकत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केले होते. पण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर वर्षभराने झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाल पुन्हा एकदा पराभूत व्हावे लागले होते.  

2013 कर्नाटक विधानसभा निवडणूक -  2013 साली झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवत 122 जागांसह दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयाचा आनंदही फार काळ टिकला नाही कारण 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेसमोर काँग्रेस चारीमुंड्या चीत झाली होती. 
त्यामुळे यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जिंकणारा पक्ष पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीही विजयी होऊन हे मिथक तोडतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 

Web Title:  'History is a witness' ... who wins in Karnataka, they lose In Lok sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.