'He' also got 'illuminated'; Who is the rising star of Priya Prakash's videos? | 'तो'ही झाला 'रोशन'; प्रिया प्रकाशच्या व्हिडीओतील उगवता तारा कोण ?
'तो'ही झाला 'रोशन'; प्रिया प्रकाशच्या व्हिडीओतील उगवता तारा कोण ?

नवी दिल्ली- सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरनं अनेकांना स्वतःच्या अदांनी अक्षरशः घायाळ केलं. परंतु प्रिया प्रकाश वारियर ज्याच्यावर फिदा आहे तो रोशन अब्दुल रहुफ काहीसा दुर्लक्षित राहिलाय. प्रियाबरोबर व्हिडीओतून दिसणारा अभिनेता रोशनही आता चर्चेत येऊ लागला आहे. रोशन हा फक्त 18 वर्षांचा असून, व्हिडीओमध्ये तो प्रियाशी फ्लर्ट करताना दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रियाबद्दल सर्वकाही समजलं आहे, आता रोशनबद्दल जाणून घेऊ या. रोशन सध्या कॉलेजियन शिक्षण पूर्ण करतो आहे.

तो त्रिशूरमध्ये आयसीएच्या पहिल्या वर्षाला आहे. रोशन हा अभिनयासोबत उत्तम नृत्यही करतो. त्यानं एका डान्स रिअॅलिटी शोतल्या 'डी 4' मध्येही सहभाग घेतला आहे. रोशनसाठी हा पहिलाच सिनेमा आहे. चित्रपटातील गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला रोशनही मीडियासमोर व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की, या चित्रपटात पाच अभिनेते आणि पाच अभिनेत्री असतील. मी आणि प्रिया त्यातीलच एक जोडी आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माझ्या कुटुंबीयांना उत्कंठा लागून राहिली आहे. रोशननं याआधी कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. या चित्रपटामुळे रोशनला चांगल्या ऑफर मिळतील, अशी आशा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रिया प्रकाश वारियर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी  व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री आहे. व्हॅलेंटाइन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे. प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय.काय आहे व्हिडीओमध्ये ?
व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांमधील प्रेमाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रिया डोळ्यांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तिच्या या अदा अगदी कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे. दरम्यान प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.  


Web Title: 'He' also got 'illuminated'; Who is the rising star of Priya Prakash's videos?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.