हार्दिक पटेलचे आणखी पाच कथित सेक्स व्हिडिओ झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 1:21pm

आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीच्या या राजकारणात पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलचा आणखी एक कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसे राजकीय वातावरणही तापत चालले आहे. आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीच्या या राजकारणात पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलचा आणखी एक कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन हार्दिकचे समर्थक आणि भाजपामध्ये शाब्दीक लढाई जुंपली आहे. 

हार्दिकचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने या सेक्स टेप लीक करण्यात आल्या असून, त्याचा हा तिसरा भाग आहे. मागच्या महिन्यात हार्दिकचे दोन सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये हार्दिकसोबत एक मुलगी आहे. मतदानाच्या पाच ते सात दिवस आधी या व्हिडिओ टेप्स व्हायरल करण्यात येतील असे हार्दिकने म्हटले होते. 

गुजरातमध्ये आणखी दोन दिवसांनी नऊ डिसेंबरला मतदान होणार आहे. आज दुपारनंतर पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. पटेल आरक्षण आंदोलनाच्या मुद्यावरुन हार्दिकने गुजरातमध्ये भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. जनतेमधील हार्दिकची विश्वासहर्ता संपवण्यासाठी गुजरातमध्ये अशा प्रकारचे राजकीय डाव खेळले जात आहेत. 

नव्याने व्हायरल झालेल्या पाच क्लीप्स यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओचा पुढचा भाग आहेत. हार्दिकसोबत दोन जण आणि एक मुलगी व्हिडिओमध्ये दिसते. घरातले दिवे बंद झाल्यानंतर दोन जण निघून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. भाजपाने या क्लीप्समध्ये छेडछाड केली असून हे व्हिडिओ बनावट असल्याचा हार्दिक समर्थकांचा दावा आहे.  

हार्दिक पटेल याआधीच या प्रकाराचे खापर भाजपावर फोडत संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  

 

संबंधित

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा गंभीर आरोप
देशाचे पायलट म्हणून नरेंद्र मोदी अपयशी
हार्दिक पटेलच्या मार्गदर्शनात शुक्रवारी अकोल्यात युवा एल्गार मेळावा
हार्दिक पटेल यांची २३ मार्चला अकोल्यात जाहीर सभा
राहुल गांधीला माझा नेता मानत नाही - हार्दिक पटेल

राष्ट्रीय कडून आणखी

पचौरींविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित
एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही
भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात
भ्रष्टाचारासाठी ‘आंबेडकर प्रोजेक्ट’चे नाव बदलविले, राहुल गांधींचा घणाघाती आरोप 
#AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी 

आणखी वाचा