'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा', आशुतोष यांच्या राजीनाम्यावर कुमार विश्वास यांचे ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:19 PM2018-08-15T13:19:23+5:302018-08-15T13:22:16+5:30

याआधीही कुमार विश्वास यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट टीका केली आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे

'Happy Independence Day', Kumar Vishwas's tweet about Aashutosh's resignation | 'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा', आशुतोष यांच्या राजीनाम्यावर कुमार विश्वास यांचे ट्वीट

'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा', आशुतोष यांच्या राजीनाम्यावर कुमार विश्वास यांचे ट्वीट

Next

नवी दिल्ली- पत्रकार ते राजकीय नेता असा प्रवास करणाऱ्या आशुतोष यांनी आता आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला आहे. आम आदमी पार्टीमधून एकेक नेते बाहेर पडण्याची कारणे वेगवेगळी असली तरी आशुतोष यांच्या राजीनाम्यावरुन टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यावर कुमार विश्वास यांनी ट्वीट करुन केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा असे कुमार विश्वास यांनी ट्वीट केले आहे.



आपल्या ट्वीटमध्ये आशुतोष यांनी लिहिले आहे, ''हर प्रतिभा संपन्न साथी की षड्यंत्रपूर्वक निर्मम राजनैतिक हत्या के बाद एक आत्ममुग्ध असुरक्षित बौने और उसके सत्ता-पालित, 2G धन लाभित चिंटुओं को एक और “आत्मसमर्पित-क़ुरबानी” मुबारक हो ! इतिहास शिशुपाल की गालियाँ गिन रहा है. आज़ादी मुबारक!''

याआधीही कुमार विश्वास यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट टीका केली आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून आपली वर्णी लागेल अशी कुमार विश्वास यांना अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते मात्र केजरीवाल यांनी संजय सिंह, नारायण दास गुप्ता व सुशील गुप्ता यांची राज्यसभेसाठी निव़ड केली. तसेच कुमार विश्वास यांच्यावर पक्ष तोडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.  



 

 

Web Title: 'Happy Independence Day', Kumar Vishwas's tweet about Aashutosh's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.