भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:29 AM2017-12-19T01:29:42+5:302017-12-19T01:30:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.

 Half of BJP, how many states? | भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

googlenewsNext

हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.
हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आ. जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. गुजरातेत पाटीदार नेते नितीन पटेल यांचा दावा असला, तरी विजय रूपाणी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवले जाऊ शकते.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयामुळे मोदी सरकारला सुधारणा कार्यक्रम सुरू ठेवणे सुलभ होणार आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे आलेल्या अडथळ्यांची ते पर्वा
करणार नाहीत, असे दिसते. २०१४ पासून मोदी सरकार आपल्या आर्थिक कार्यक्रमावर ठाम असल्याचे चित्र
दिसून आले. हा कामगिरी आणि विकासाचा विजय आहे. देश कामगिरी आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
गुजरातची निवडणूक राहुल गांधी यांची नव्हे, तर मोदी यांची कसोटी पाहणारी होती. कर्नाटकची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. हे मोठे राज्य असून, तेथे काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटकात भाजपा जिंकल्यास काँग्रेसमुक्त भारताची कल्पना स्वप्न नसल्याचे सिद्ध होईल. मोदी-शहा यांचा धडाका पाहता, शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधी व अन्य मोदीविरोधकांना आता विचार करावा लागेलच, शिवाय विरोधी पक्षांनाही ‘महागठबंधना’च्या स्वप्नाबाबत जलदगतीने विचार करावा लागेल.
गुजरात : भाजपा
हिमाचल प्रदेश : भाजपा
उत्तराखंड : भाजपा
हरयाणा : भाजपा
राजस्थान : भाजपा
मध्य प्रदेश : भाजपा
छत्तीसगड : भाजपा
झारखंड : भाजपा
आसाम : भाजपा
अरुणाचल : भाजपा
गोवा : भाजपा
उत्तर प्रदेश : भाजपा
मणिपूर : भाजपा
महाराष्ट्र : भाजपा
+शिवसेना
जम्मू काश्मीर : पीडीपी
+भाजपा
बिहार : जनात दल + भाजपा
कर्नाटक : काँग्रेस
पुद्दुचेरी : काँग्रेस
मिझोरम : काँग्रेस
मेघालय : काँग्रेस
पंजाब : काँग्रेस
दिल्ली : आप
प. बंगाल : तृणमूल
ओडिशा : बिजू जनता दल
तेलंगणा : तेलंगण राष्ट्रीय
आंध्र प्रदेश : तेलगू देसम
तामिळनाडू : अण्णा द्रमुक
केरळ : डावी आघाडी
त्रिपुरा : मार्क्सवादी
नागालँड : नागा पिपल्स
सिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट

Web Title:  Half of BJP, how many states?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.