गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदी, अमित शहांची जादू पुन्हा एकदा चालली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:15 AM2019-05-24T05:15:57+5:302019-05-24T05:17:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातने पुन्हा एकदा भाजपला संपूर्ण पाठिंबा दर्शवित सर्व २६ जागांवर या पक्षाला बहुमत मिळवून दिले.

Gujarat Lok Sabha election results 2019: Amit Shah's magic goes on again in Gujarat | गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदी, अमित शहांची जादू पुन्हा एकदा चालली

गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदी, अमित शहांची जादू पुन्हा एकदा चालली

Next

- प्रसाद गो. जोशी
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातने पुन्हा एकदा भाजपला संपूर्ण पाठिंबा दर्शवित सर्व २६ जागांवर या पक्षाला बहुमत मिळवून दिले. मागील वेळेप्रमाणेच यंदाही गुजरातच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना साथ दिली. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठीच्या मतदानाचे वेगवेगळे निकष असल्याचेही दाखवून दिले.

सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी मतदान झाले आणि कॉँग्रेसने भाजपला टक्कर दिल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीमध्येही हाच प्रकार घडण्याची अपेक्षा कॉँग्रेस बाळगून होती. मात्र मतदारांनी केंद्रातील सरकारसाठी भाजपच्या पाठीशी असल्याचे मतदानयंत्रामार्फत दाखवून दिले आणि भाजपने गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती केली.नव्वदच्या दशकापासूनच भाजप हा गुजरातचा गड राहिलेला आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला अचानक जनतेची साथ मिळाली आणि भाजपला १५ वर्षांनंतर प्रथमच येथे विजयासाठी झगडावे लागले होते. त्यामुळेच कॉँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये घेण्यात आली.

त्यानंतर मात्र कॉँग्रेसला आपला टेम्पो राखता आला नाही. गुजरातमध्ये कॉँग्रेसकडे कार्यकर्त्यांची टंचाई आहे, त्याचप्रमाणे पक्षसंघटनाही विस्कळीत असल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. त्यामुळे तसेच पंतप्रधानपदरवर गुजरातचा माणूस बसविण्याची गुजरातच्या जनतेची इच्छा प्रबळ असल्याने त्यांनी भाजपला पसंती दिलेली दिसते.

निकालाची कारणे

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी पंतप्रधानपदासाठी मोदींनाच पसंती.

पाटीदार आंदोलनामुळे प्रकाशात आलेले अल्पेश ठाकूर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची साथ सोडून गेले.

हार्दिक पटेल यांना न्यायालयाच्या निकालामुळे निवडणूक लढविता आली नाही. कॉँग्रेसकडे कार्यकर्त्यांची कमतरता.


दादरा, नगर- हवेली । भाजपने साधली हॅट्ट्रीक
महाराष्टÑ आणि गुजरात या दोन राज्यांना लागून असलेल्या या केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेची एकमात्र जागा जिंकून भाजपने हेथे हॅट्ट्रीक साधली आहे. भाजपला रोखण्यासाठी कॉँग्रेसने येथे लोकप्रिय असलेल्या आदिवासी नेते मोहनभाई डेलकर यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांनी केलेले प्रयत्न कमी पडले असेच दिसून येत आहे. येथील शेती आणि लहान उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांमुळेच त्यांना येथे यश मिळाले आहे.

दीव -दमण । भाजपने दिली कॉँग्रेसला मात
१९८७मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवून कॉँग्रेसला मात दिली आहे. पूर्वी गोव्याचा भाग असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा भाजपचे मताधिक्य घटले असले तरी त्यांना मिळालेला विजय महत्वपूर्ण आहे. याआधी झालेल्या सात निवडणुकांमध्ये कॉँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी तीन वेळा येथून निवडणूक जिंकली आहे तर एकदा अपक्ष उमेदवार येथून विजयी झाला आहे.

 

Web Title: Gujarat Lok Sabha election results 2019: Amit Shah's magic goes on again in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.