काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 02:54 PM2018-06-18T14:54:21+5:302018-06-18T14:54:21+5:30

ठाकोर यांच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Gujarat Congress leader Alpesh thakor showers money at a devotional programme in Patan Gujrat | काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरांचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

Next

पाटण: गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ गुजरातमधील पाटणा येथील एका धार्मिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात अल्पेश ठाकोर नोटा उडवताना दिसत आहेत. ठाकोर यांच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोदी माझ्यासारखे काळे होते पण दिवसाला 4 लाखांचे 'इम्पोर्टेड' मशरूम खाऊन गोरे झाले : अल्पेश ठाकोर

गुजरातमधील भजनाच्या कार्यक्रमात पैसे उडवले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नोटाबंदीनंतरच्या काळात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना गुजरामधील नवसारी येथील एका कार्यक्रमात एका भजन समारंभात ४० लाख रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा कार्यक्रम चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. 



 

Web Title: Gujarat Congress leader Alpesh thakor showers money at a devotional programme in Patan Gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.