केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 07:49 AM2017-10-25T07:49:39+5:302017-10-25T08:57:45+5:30

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे.

gujarat assembly elections date schedule by ec today | केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर?

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर?

googlenewsNext

अहमदाबाद -  केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. निवडणूक आयोगानं गुजरातच्या निवडणुका हिमाचल प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमासोबत जाहीर न केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, निवडणुकीपूर्वी येथील वातावरण तापू लागलं आहे. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.  कारण निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसही जोमानं उतरल्याचं पाहायला मिळत आहे. 

गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकार, ओपिनियन पोलमध्ये दोन तृतियांश बहुमताचा अंदाज
सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. 

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचा भरणा असलेल्या गुजराती समाजामध्ये भाजपाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसत आहे. त्यामुळे भाजपाला यावेळची विधानसभा निवडणूक कठीण जाणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

हार्दिक पटेल निष्प्रभ 
या ओपिनियन पोलनुसार गुजरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झालेल्या हार्दिक पटेलचा प्रभाव पडणार नाही. पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल भाजपाला नुकसान करू शकत नाही. तसेच हार्दिक पटेल आणि काँग्रेस एकत्र आल्यास त्यामधूनही काँग्रेसला फारसा लाभ होणार नाही. हार्दिक पटेल काँग्रेससोबत असल्यात काँग्रेसच्या जागा किरकोळ प्रमाणात वाढून त्यांना 62 ते 71 पर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

मुख्यमंत्री म्हणून रुपानी यांना पसंती
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पोलमध्ये विजय रुपानी यांना पसंत देण्यात आली आहे. रुपानी यांना 34 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसच्या शक्ति सिंह गोहिल यांना 19 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. 

Web Title: gujarat assembly elections date schedule by ec today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.