gujarat assembly elections 2017 rahul gandhi question to pm modi | अन्नदात्याला का केले बेरोजगार? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना गुजरातमधील कर्जमाफीवरुन प्रश्न

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावणार आहेत. यादरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम जारी ठेवला आहे. गुरुवारी (7 डिसेंबर) सकाळी राहुल गांधी यांनी आपला नववा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गुजरातमधील कर्जमाफी, पिकाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय आहे राहुल गांधी यांचा प्रश्न ?
''कर्जमाफी केली नाही, पिकांना योग्य भाव दिला नाही, पिकविम्याचे रक्कम मिळाली नाही, ट्यबुवेलची व्यवस्था झाली नाही.  अन्नदात्याला का केले बेरोजगार?, खेडुतांसोबत इतका सापत्न व्यवहार का ? पीएम साहेब सांगा'' असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.  

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दररोज पंतप्रधान मोदींना गुजरातमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत. राहुल गांधी 29 नोव्हेंबरपासून दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. राहुल यांनी मोदींना सर्वप्रथम घरांच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला होता.  


राहुल गांधींचा आठवा प्रश्न


राहुल गांधींचा सातवा प्रश्न 

राहुल गांधींचा सहावा प्रश्न


राहुल गांधींचा पाचवा प्रश्न


राहुल गांंधींचा चौथा प्रश्न


राहुल गांधींचा तिसरा प्रश्न 

राहुल गांधींचा दुसरा प्रश्न


राहुल गांधींचा पहिला प्रश्न