GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 01:47 PM2018-07-01T13:47:37+5:302018-07-01T13:47:51+5:30

देशात एक राष्ट्र एक टॅक्सची कल्पनेसाठी लागू करण्यात आलेला सेवा आणि वस्तू करा(जीएसटी)ला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

GST DAY: Tax reforms in global challenges succeeded: Jaitley | GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

Next

नवी दिल्ली- देशात एक राष्ट्र एक कराची संकल्पना राबवण्यासाठी लागू करण्यात आलेला सेवा आणि वस्तू करा(जीएसटी)ला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जीएसटीची वर्षपूर्ती साजरी करत आहे. जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अरुण जेटलींनी संबोधित केलं. तसेच या कार्यक्रमात जीएसटीला एका लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

सेंट्रल हॉलमध्ये 1 जुलै 2016 रोजी जीएसटी या कर प्रणालीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशातल्या ब-याचशा राज्य सरकारांमध्येही जीएसटी लागू करण्यात आला. जेटली म्हणाले, मोदी सरकार सर्वच राज्यांमध्ये जीएसटी लागू करण्यास तयार आहे. राज्यांनी जीएसटी लागू केल्यास केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून त्यांना होणा-या नुकसानाची भरपाई देण्यास तयार आहे. जीएसटी लागू केल्यानंतर करवसुलीत फायदा झाला आहे. जवळपास 11.9 टक्क्यांहून अधिक कर जमा झालेला आहे.

जीएसटीच्या यशासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. केंद्र सरकारला अशाच प्रकारे फायदा होत राहिल्यास व्यावसायिक आणि ग्राहकांना आम्ही करात सवलत देऊ शकतो. येत्या पाच वर्षांत जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कराच्या स्वरूपात सरकारी तिजोरीत रक्कम गोळा होणार आहे. जगभरात अनेक देशांनी जीएसटी प्रणाली राबवूनही त्यांना ती यशस्वी करता आलेली नाही. परंतु भारतात जीएसटीला चांगलं यश मिळालं आहे. जागतिक आव्हानांतही जीएसटी कर प्रणाली लागू केल्यानं सरकार आणि व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला आहे. 

Web Title: GST DAY: Tax reforms in global challenges succeeded: Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.