आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:54 PM2019-05-15T23:54:10+5:302019-05-15T23:54:41+5:30

गुवाहाटीमधील ज्यू रोड येथील एका मॉलबाहेर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला.

grenade blast near Guwahati mall, ULFA-I claims explosion responsibility | आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी

आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी

Next

आसाम : गुवाहाटीमधील ज्यू रोड येथील एका मॉलबाहेर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉलसमोर रात्री 8 वाजताच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात 12 जण जखमी झाले असून चौकशी सुरु असल्याचे दीपक कुमार यांनी म्हटले आहे.  तसेच, ग्रेनेड स्फोटातील जखमींना गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.


दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी ULFA-I या बंदी घातलेल्या संघटनेने घेतली आहे. तसेच, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या स्पोटातील आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 



 

Web Title: grenade blast near Guwahati mall, ULFA-I claims explosion responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Assamआसाम