राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नानं विद्यार्थी चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:58 PM2019-07-15T16:58:34+5:302019-07-15T17:01:49+5:30

राज्यसेवा आयोगानं केले हात वर

Is Governor A Puppet Question In Bihar Civil Service Exam | राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नानं विद्यार्थी चकीत

राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नानं विद्यार्थी चकीत

Next

पाटणा: राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का, असा प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आला. त्यामुळे परीक्षेला आलेले विद्यार्थी चकीत झाले. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कळसूत्री बाहुली असतात का?, असे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. 

राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. यानंतर राज्यसेवा आयोगानं यामध्ये आपली चूक नसल्याचं स्पष्ट केलं. प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षकच यात दोषी असल्याचं आयोगानं म्हटलं. त्या प्रश्नात कोणतीही चूक नाही. मात्र कळसूत्री बाहुली हा शब्द टाळता आला असता, असं आयोगानं म्हटलं. सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपाची सत्ता आहे. संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार सरकारचं नेतृत्व करत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. 




राज्यसभा आयोगाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांची संख्या आणि निवडणूक याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. जास्त पक्षांनी निवडणूक लढवण्याचे फायदे आणि तोटे सांगा, असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला. बिहारच्या शालेय परीक्षादेखील कायम वादामुळे चर्चेत राहिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आठवीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक प्रश्न अतिशय वादग्रस्त ठरला होता. पाच देशांच्या नागरिकांना काय म्हणालं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. चीन, नेपाळ, इंग्लंड, भारत आणि काश्मीर अशी नावं त्यापुढे देण्यात आली होती. 

 

Web Title: Is Governor A Puppet Question In Bihar Civil Service Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.