सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 04:49 AM2019-06-17T04:49:31+5:302019-06-17T04:49:51+5:30

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

Government should fulfill the expectations of the people - Mohan Bhagwat | सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

Next

नागपूर : देशातील जनतेने भाजप सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे. २०१४ च्या तुलनेत अधिक जागा निवडून दिल्या आहेत. याचाच अर्थ जनतेच्या काही अपेक्षा या सरकारने पूर्ण केल्या होत्या तर काही अपूर्ण आहेत. अपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जनतेने पुन्हा संधी दिली आहे. तेव्हा सरकारने जबाबदारीने त्या पूर्ण केल्याच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला पू. चित्तरंजन जी महाराज (आगरतळा), कृष. गोपालकृष्ण जी (बंगळुरु). यशराज व युवराज (दिल्ली), डॉ. कृष्णास्वामी (कोईम्बतुर), पाचीपाला दोरा स्वामी, रमेश (जालंधर) आणि श्री हासन वासजी ढेम्पो (गोवा) हे प्रमुख अतिथी होते.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पहिल्यांदाच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते काय बोलतात, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी, सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु ते म्हणाले, देशातील मतदार हे पहिल्या निवडणुकीपासून काही ना काही शिकत आले आहेत. मतदार आता अधिक जागरुक झाले आहेत.
देशाची अखंडता, एकता, विकास आणि पारदर्शकतेला ते मतदान करू लागले आहेत. तेव्हा निवडणुकीत त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले.

पश्चिम बंगालची परिस्थिती देशासाठी घातक
निवडणुकीमध्ये स्पर्धा असते. निवडून येण्यासाठी बरेच काही बोलले जाते. परंतु निवडणूक संपली की स्पर्धा संपते. संसदेत निवडून येणाºया सर्वपक्षीय लोकांनी देशासाठी मिळून काम करायचे असते. जिंकणाºयाने गुर्मीत राहिले आणि हरणाºयाने संतापात राहिले तर देशाचे काय होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या तेच सुरू आहे. खुर्चीचा मोहभंग किती हादरवून सोडतो. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा यायला हवी, अशी भाषा योग्य नाही. देशासाठी हे घातक आहे, असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दिला होता इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितले होते की, आपल्या देशाला कुणी ताकदीच्या जोरावर जिंकले नाही, तर आपण आपसात लढल्यामुळेच त्यांना आपल्याला जिंकता आले, हा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

Web Title: Government should fulfill the expectations of the people - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.