गोरखपूर बालमृत्यूकांड : नामकरणाआधीच त्यांच्यावर घातली मृत्यूने झडप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 08:30 AM2017-08-13T08:30:16+5:302017-08-13T09:27:55+5:30

गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी 17 नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे.  

Gorakhpur Balmuthurukkunda: The clash of deaths already laid down before the nomination | गोरखपूर बालमृत्यूकांड : नामकरणाआधीच त्यांच्यावर घातली मृत्यूने झडप 

गोरखपूर बालमृत्यूकांड : नामकरणाआधीच त्यांच्यावर घातली मृत्यूने झडप 

ठळक मुद्देगोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी 17 नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे.  मृत्यू झालेल्या 17   नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती. गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

गोरखपूर, दि. 13 - गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी 17 नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे.  त्यामुळे मुलांच्या जन्माचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांच्या मृत्यूचे शोक करण्याची वेळ त्यांच्या आईवडलांवर आली आहे. 
 उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या बालमृत्यूकांडात साठहून अधिक बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17   नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती.  त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे.   
बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, नेमके हे मृत्यू कशामुळे झाले, हे सांगण्यास सरकार तयार नाही, तसेच मृतांचे पोस्टमार्टेमही करण्यात आले नाही, असे समजते.
गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उत्तर प्रदेश सरकार, तसेच प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अतिशय संतापले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल व केंद्रीय आरोग्य सचिव यांना गोरखपूरला सकाळीच पाठविले. त्यांच्यामार्फत पंतप्रधान सातत्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

माहितीच लपविण्याचा केला प्रयत्न
या रुग्णालयातील ३0 जण ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मरण पावल्याचे वृत्त आल्यावर, राज्य सरकारने असे काहीही घडले नसल्याचा दावा आधी केला. त्यानंतर, केवळ सात जण शुक्रवारी मेले आणि त्याचा आॅक्सिजनशी संबंध नाही, असे सरकारने खुलाशात नमूद केले. मात्र, रुग्णालयात ७ आॅगस्टपासून रोज रुग्ण मरत होते. १0 आॅगस्ट रोजी तर मृतांचा आकडा २३ होता. हे माहीत असतानाही राज्य सरकार मृतांविषयीची माहिती सातत्याने लपवून ठेवू पाहात होते. जेव्हा आकडा ६३ असल्याचे उघडकीस आले, तेव्हा मात्र सरकारच तोंडघशी पडले.
 

Web Title: Gorakhpur Balmuthurukkunda: The clash of deaths already laid down before the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.