OBC साठी खुशखबर, सरकारने MBBS प्रवेशाच्या जागा वाढवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:09 PM2019-07-23T17:09:24+5:302019-07-23T17:10:16+5:30

आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत.

The good news for OBC, the government has increased MBBS admissions 970 seat in maharashtra | OBC साठी खुशखबर, सरकारने MBBS प्रवेशाच्या जागा वाढवल्या

OBC साठी खुशखबर, सरकारने MBBS प्रवेशाच्या जागा वाढवल्या

Next
ठळक मुद्देकेंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने वाढवलेल्या या जागांमध्ये सर्वाधिक 970 जागा महाराष्ट्रासाठी वाढविण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची महाविद्यालये आणि सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील महाविद्यालयांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी या जागा वाढविण्यात आल्या आहेत. 

केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने वाढवलेल्या या जागांमध्ये सर्वाधिक 970 जागा महाराष्ट्रासाठी वाढविण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये 700 तर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 450  जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशात 360 आणि उत्तर प्रदेशात 326 जागा उपलब्ध असतील. तर गोव्यात 30 आणि पदुचेरी येथे सर्वात कमी म्हणजेच 25 जागा वाढविण्यात आल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे. तर, महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यामुळे बारावीनंतर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या यादीत आणखी 970 विद्यार्थ्यांना स्थान मिळणार आहे. तर, राज्यातील वैद्यकीय प्रवेश  

Web Title: The good news for OBC, the government has increased MBBS admissions 970 seat in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.