भाजपाच्या डोक्यातून कर्नाटक जाईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:50 AM2018-05-22T00:50:24+5:302018-05-22T00:50:24+5:30

नेते करत आहेत दावा : आमदार फुटून राज्यात २0१९ पर्यंत होईल सत्तांतर

Going to Karnataka through BJP's head | भाजपाच्या डोक्यातून कर्नाटक जाईना

भाजपाच्या डोक्यातून कर्नाटक जाईना

Next

नवी दिल्ली : कर्नाटकात येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या डोक्यात अद्यापही सरकार स्थापन करण्याचा विचार डोकावत आहे. अमित शहा यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले असून, २0१९ पर्यंत कर्नाटकात सत्तांतर होईल, असे त्यांनी सोमवारी सांगितले.
आम्हाला कर्नाटकात फार काही करायची गरज नाही. काँग्रेस व जनता दलाचे आमदारच आमचे काम करतील आणि तेथील सरकार कोसळेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यावेळी जनता दलाच्या मदतीने तुम्ही सरकार बनवाल का, असे विचारता शहा म्हणाले की, राजकारणात कायमस्वरूपी असे काहीच नसते. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित काँग्रेस व जनता दल या दोन्ही पक्षांतील आमदार फुटून वेगळा गट तेव्हा स्थापन करू शकतील.
याचाच अर्थ भाजपाने कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे सोडून दिलेले नाही. तिथे आपले सरकार पुन्हा येईल, अशी खात्री अमित शहा व भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे. तसा विश्वास ते आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार देत आहेत.
कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांची आघाडी अनैतिक पायावर उभी असल्याचा आरोप अमित शहा यांनी आज केला. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेस व जनता दलाच्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांचे काही आमदार खूष नाहीत. आमचे त्या आमदारांवर कायम लक्ष राहील. दुसरीकडे कुमारस्वामी सरकारवर आमचा सातत्याने दबाव राहील. ते सरकार काय पद्धतीने काम करते, हे आम्ही पाहू, प्रसंगी त्यांचा गोंधळ जनतेसमोर आणू आणि रस्त्यांवर संघर्षही करू. भाजपा येथे सरकार बनवू शकते, अशी आम्हाला खात्री वाटेल, त्यावेळी दोन्ही पक्षांचे काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील. आम्ही आजही काँग्रेस व जनता दलाच्या काही आमदारांशी संपर्क करुन आहोत. काँग्रेस व कुमारस्वामींच्या आघाडीबद्दल दोन्ही पक्षांत समाधान असे ते आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमच्याऐवजी ते आमदारच स्वत:च्या सरकारच्या विरोधात जात असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल, असे भाजपा नेता म्हणाला. लेकिन भाजपा अभी भी अमित शाह ने म्हणाले की काँग्रेस व जनता दल नेत्यांनी आपल्या सर्व आमदारांना जबरदस्तीने हॉटेलात बंदिस्त करून ठेवले आहे. ते जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा दोन पक्षांच्या अभद्र आघाडीबद्दल त्यांनाच उत्तरे द्यावी लागतील.

आता जाऊ द्या की घरी!
सध्या काँग्रेसचे आमदार एका हॉटेलात तर जनता दलाचे आमदार एका रिसॉर्टमध्ये आहेत. निवडून आल्यापासून ते घराबाहेर आहेत.
विजयी झाल्यानंतर मतदारसंघात मिरवणुका काढायला त्यांना वेळही मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणे शक्य झाले नाही.
कार्यकर्ते सोडा, पण किमान मतदारांचे आभार मानायला तरी आम्हाला मतदारसंघात जायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहुमत सिद्ध व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आता आम्हाला लवकर घरी जायचे आहे, असे आमदारांनी नेत्यांनाच सांगितले आहे. आज सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे निरीक्षक खा. वेणुगोपाळ यांनी या आमदारांशी गप्पा मारल्या.

आॅडिओ टेप्स खऱ्या की खोट्या?
भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवल्याच्या ध्वनिफिती बाहेर आल्या होत्या. त्यापैकी एका काँग्रेस आमदाराने आपल्या पत्नीस असे कोणतेही आमिष दाखवण्यात आले नव्हते. या आॅडिओ टेप खºया नाहीत, असे सांगून काँग्रेसलाच अडचणीत आणले. दुसºयाने मात्र भाजपाचे नेत्यांचे फोन येताच, त्याचे रेकॉर्डिंग केले. त्याने तीनदा भाजपाकडून आलेल्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग केले आहे. आपणास आमिष दाखवण्यात आले होते, असे तो म्हणाला.

Web Title: Going to Karnataka through BJP's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.