परदेशात जाण्याआधी राहुल गांधींचा भाजपाच्या ट्रोल आर्मीसाठी 'स्पेशल' मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 01:23 PM2018-05-28T13:23:17+5:302018-05-28T13:23:17+5:30

भाजपाच्या सोशल मीडिया सेलला टोला 

Before Going Abroad Rahul gandhi Has a Message For BJPs Troll Army | परदेशात जाण्याआधी राहुल गांधींचा भाजपाच्या ट्रोल आर्मीसाठी 'स्पेशल' मेसेज

परदेशात जाण्याआधी राहुल गांधींचा भाजपाच्या ट्रोल आर्मीसाठी 'स्पेशल' मेसेज

Next

मुंबई: ट्विटरवर अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आता भाजपाच्या सोशल मीडिया आर्मीवर निशाणा साधलाय. आईच्या उपचारासाठी परदेशात जाण्याआधी राहुल गांधींनी ट्विटरवर भाजपाच्या सोशल मीडिया सेलला टोला लगावला. 

राहुल गांधींना अनेकदा भाजपाच्या सोशल मीडिया सेलकडूल लक्ष्य केलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भाजपाच्या सोशल मीडिया सेलवर शरसंधान साधलं. 'आईच्या उपचारांसाठी काही दिवस परदेशात असेन. भाजपाच्या सोशल मीडिया ट्रोल आर्मीतील माझ्या मित्रांनो, फार त्रास करुन घऊ नका. मी लवकरच परतेन,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. राहुल गांधी आठवड्याभरानंतर भारतात परततील. तर सोनिया गांधी आणखी काही काळ परदेशातच राहणार आहेत. 





देशात अनेकदा महत्त्वाच्या घटना घडत असताना राहुल गांधी परदेशात असतात, अशी टीका भाजपाकडून केली जाते. त्यामुळेच राहुल गांधी यावेळी परदेशात रवाना होण्याआधीच ट्विट केलंय. याशिवाय त्यांनी या ट्विटमधून भाजपाच्या सोशल मीडिया सेलवरही निशाणा साधलाय. काँग्रेसमधील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सोनिया यांच्यावर 2011 मध्ये अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना वर्षातून एकदा तपासणीसाठी अमेरिकेला जावं लागतं. 

Web Title: Before Going Abroad Rahul gandhi Has a Message For BJPs Troll Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.