'स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार', म्हणणाऱ्या वकिलाला न्यायाधीशांनी कोर्टातून हाकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 02:50 PM2018-02-06T14:50:40+5:302018-02-06T14:55:16+5:30

बचाव करताना वकिलानं केलेल्या वादग्रस्त वक्याव्यामुळं त्याला कोर्टमधून हाकलून देण्यात आलं.

godman-virendra-dev-dixits-lawyer-said-woman-are-the-door-of-the-hell | 'स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार', म्हणणाऱ्या वकिलाला न्यायाधीशांनी कोर्टातून हाकललं

'स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार', म्हणणाऱ्या वकिलाला न्यायाधीशांनी कोर्टातून हाकललं

Next

नवी दिल्ली - मुलींना आश्रामात डांबून ठेवून त्यांच्यावर लैगिंग आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या विरेंद्र देव दिक्षित यांचा बचाव करताना वकिलानं केलेल्या वादग्रस्त वक्याव्यामुळं त्याला हाय कोर्टमधून हाकलून देण्यात आलं. विरेंद्र देव दिक्षित यांचा बचाव करताना सुरु असलेल्या चर्चेदरम्यान त्याचा वकिल म्हणला की 'स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार'. त्याच्या या वक्तव्यानंतर मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्या वकिला खडे बोल सुनावत कोर्टाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. 

विरेंद्र देव दिक्षितचे वकिल बचाव करताना म्हणाले की, 'स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार असते, त्यामुळं आम्ही मुलींना आश्रमात कैद करुन ठेवतो.'  त्याचं हे वक्तव्य ऐकून न्यायाधिशासह कोर्टात उपस्थित सर्वचजण आच्छर्यचकित झाले. नवी दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी वकिलाच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. हे वक्तव्य आपत्तिजनक असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. त्यानंतर मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्याला कोर्टाच्या बाहेर हाकलून दिले. 



 

आम्ही कोणत्याच सोसायटीचा भाग नाही, किंव्हा आम्हावर कोणत्याही विद्यापिठाचा आदेश लागू होत नाही. कारण आम्ही कोणतीच डिग्री किंवा डिप्लोमाची पदवी देत नाही. असे विरेंद्र देव यांच्या वकिलानं कोर्टात सांगितलं. यावर कोर्टानं त्यांना प्रतिप्रश्न विचारला, तुम्ही आश्रमाला विद्यापिठ कसे म्हणता? त्यावर वकिल म्हणाले की, आश्रमाचा करताकरविता देव आहे. त्यामुळं आम्ही त्याला विद्यापिठ म्हणतो. वकिलानं विरेंद्र देव दिक्षित यांना देव म्हटले. ते म्हणाले की, देव स्वत ज्ञान देत आहेत. तर त्याला कोण विद्यापिठ म्हणण्यास नकार देऊ शकतो. 



 

यावर दिल्ली सरकारचे अधिवक्ताने कोर्टात सांगितले की, दिक्षित स्वत:ला सर्वापेक्षा मोठं समजतात. ते स्वत:ला देव समजतात. कोर्टानं यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, आश्रम विद्यापिठ या शब्दाचा वापर करु शकत नाही. कारण त्याची निर्मीती ही विद्यापिठाच्या नियमानुसार झालेली नाही. युजीसीची मान्यताही त्याला मिळालेली नाही. त्यामुळं आश्रमानं स्वतला विद्यापिठ म्हणू नये. 



 

या केसचा पाठपुरावा केल्यानंतर सीबीआयनं दिल्ली हायकोर्टात सांगितले की, मुलींना आश्रमात कैद करण्याचा आरोप असलेले विरेंद्र दिक्षित यांच्यावर लुकआउट सर्कुलर( एलओसी) दाखल करण्यात आलं आहे. 



 

Web Title: godman-virendra-dev-dixits-lawyer-said-woman-are-the-door-of-the-hell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.