नवी दिल्ली : लहान-थोर आणि गरीब-श्रीमंत अशा सर्वांच्या आवडीच्या ‘दाल खिचडी’चा भारतीय खाद्यपदार्थांतील ‘ग्लोबल ब्रँड’ म्हणून सक्रियपणे प्रसार करण्याचे सरकारने ठरविले असून, येत्या शुक्रवारपासून दिल्लीत भरणा-या ‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ््यात भारतातर्फे ‘खिचडी’ हा अधिकृत प्रातिनिधिक पदार्थ म्हणून सादर केला जाणार आहे.
या निमित्त प्रत्यक्ष खिचडी शिजविण्याचा जागतिक विक्रम करण्याचाही आयोजकांचा मानस आहे. या खाद्यमेळ््यात ख्यातनाम शेफ संजीव कपूर सात फूट व्यासाच्या आणि एक हजार लीटर क्षमतेच्या भव्य कढईत ८०० किलोहून अधिक खिचडी शिजवतील. खाद्यमेळ््यात ‘ग्रेट इंडिया फूड स्ट्रीट’वर ही खिचडी मुख्य आकर्षण असेल. संजीव कपूर भारतीय खाद्यसंस्कृतीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर’ म्हणून प्रतिनिधित्व करतील.
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ््याचे आयोजन भारत सरकारचे अन्नप्रक्रिया मंत्रालय व ‘कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज’ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. शुक्रवारपासून तीन दिवस तो चालेल.
या खाद्यमेळ्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, या वेळी शिजविली जाणारी खिचडी ६० हजार अनाथ मुलांना व कार्यक्रमाला हजर असलेल्या पाहुण्यांना खायला दिली जाईल.

भारतामधील परकीय वकिलातींच्या प्रमुखांनाही या खिचडीचे वाटप, पाककृतीच्या सचित्र पुस्तिकेसह केले जाईल. जगभरातील भारतीय वकिलाती त्या-त्या देशात खिचडी आणि तिची पाककृती सक्रियतेने लोकप्रिय करतील. याखेरीज जगभरातील उपाहारगृहे व खाद्यकेंद्रांमध्ये खिचडी उपलब्ध व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले.

एक पोटभरीचा सकस आहार म्हणून देशाच्या कानाकोपºयास खिचडीचे समाजाच्या सर्व थरांमध्ये आवडीने सेवन केल जाते. एक प्रकारे खिचडी हे भारताच्या विविधतेतील एकतेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. म्हणूनच या खाद्यमेळ््यासाठी ‘ब्रँड इंडिया फूड’ म्हणून तिची निवड करण्यात आली आहे.
- हरसिमरत कौर बादल, केंद्रीय अन्नप्रक्रियामंत्री


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.