मुलींनी महाविद्यालयात केवळ सलवार-कुर्ता वा साडीत यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 1:44am

राजस्थानातील सरकारी महाविद्यालयांमध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांसाठी फक्त शर्ट-पँट आणि मुलींसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण संचालनालयाने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा समाजाच्या विविध स्तरातून निषेध होत आहे. हा अपमानकारक निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

जयपूर - राजस्थानातील सरकारी महाविद्यालयांमध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांसाठी फक्त शर्ट-पँट आणि मुलींसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण संचालनालयाने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा समाजाच्या विविध स्तरातून निषेध होत आहे. हा अपमानकारक निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे. राजस्थान सरकारकडून एकूण २१९ महाविद्यालये चालविली जातात. यात चार लाख विद्यार्थी असून, मुलींची संख्या १ लाख ७५ हजार आहे. संचालनालयाने कॉलेजांना ४ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत परिपत्रक पाठवले. राजस्थानच्या उच्च शिक्षणमंत्री किरण माहेश्वरी म्हणाल्या की, बाहेरील मुलांना कॉलेज आवारात येण्यास अटकाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य असावा, अशी मागणी मुलांनीच केली होती. संघाचा अजेंडा राबवण्याचा आरोप पीपल्स युनियन फॉर सिविल लिबर्टीज् (पीयूसीएल) या संस्थेने, अशी गणवेशसक्ती लागू करण्याच्या निर्णयाला घटनाविरोधी, समाजाला मागे नेणारा, पुरुषसत्ताक आणि हुकूमशाही मानसिकतेचे दर्शन घडवणारा असे म्हटले आहे. पीयूसीएलच्या महासचिव कविता श्रीवास्तव म्हणाल्या की, सरकार परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची हिंमत कशी करू शकते? आज मुली जीन्स, टी-शर्ट, पँट, स्कर्ट, घागरा आदी कपडे परिधान करतात. त्यांचे कपडे हा त्यांचा अधिकार आहे.

संबंधित

भाजपाच्या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश
पिंपरीत शाळा व महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई 
विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर
अभियांत्रिकीच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त
कनिष्ठ महाविद्यालयांचा बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा

राष्ट्रीय कडून आणखी

ई-कॉमर्स क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण का नाही?
ब्रिटनमुळेच मल्ल्याच्या मालमत्ता गोठविणे शक्य
पीएनबी घोटाळ्यात एका विधी संस्थेचीही चौकशी
कोरेगाव-भीमा हिंसाचार : राजीव गांधींप्रमाणे हत्येचा कट रचला हे निव्वळ कुभांड
आयएसआयला गुप्त माहिती देणाऱ्या जवानाला एटीएसने ठोकल्या बेड्या 

आणखी वाचा