संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 09:10 AM2018-11-19T09:10:40+5:302018-11-19T13:14:56+5:30

राजधानी नवी दिल्लीमध्ये मन हादरवणारी घटना घडली आहे. आईसोबत फूटपाथवर झापलेल्या दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

girl sleeping on footpath raped by man in new delhi | संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली 

संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली 

Next
ठळक मुद्देदीड वर्षांच्या मुलीवर कचरा वेचणाऱ्याकडून बलात्कारमुलीच्या गुप्तांगावर आढळल्या गंभीर जखमा48 तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये मन हादरवणारी घटना घडली आहे. आईसोबत फूटपाथवर झापलेल्या दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं 48 तासांच्या आत एका आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अनिल असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी कचरा उचलण्याचं काम करतो आणि तो नशेच्या आहारीदेखील गेलेला आहे. नशेत असतानाच आरोपीनं मुलीला उचललं आणि जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकाच्या पार्सल गोदामात तिला घेऊन गेला. तेथे त्यानं चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर त्यानं तेथेच पीडित मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं.  

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला या परिसरातून जाणाऱ्या तृतीयपथीयांनी पाहिलं आणि याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. यानंतर तातडीनं पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  
पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील रिक्षाचालक असून आई कचरा वेचण्याचं काम करते. शुक्रवारी रात्री मुलीची आई चांदणी चौकातील गुरुद्वारामध्ये भंडाऱ्यात जेवणासाठी गेली होती आणि तेथेच फूटपाथवर झोपली. रात्री दीड वाजेपर्यंत मुलगी आईजवळ होती, मात्र झोपेतून जाग आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे तिच्या आईला समजले.

वैद्यकीय अहवालात मुलीसोबत बलात्कार झाल्याचं निष्पन्न झाले आहे. तिच्या गुप्तांगावर नखे आणि दातांचे निशाण आढळून आले आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: girl sleeping on footpath raped by man in new delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.