‘ती मुलगी मेली हे बरेच झाले’, बँक अधिकाऱ्याचे कथुआ बलात्काराविषयी ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:30 AM2018-04-15T03:30:56+5:302018-04-15T03:30:56+5:30

कथुआतील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच, केरळमधील एका बँक अधिका-याने ‘ती मुलगी मेली, हे बरेच झाले.

'The girl got killed so much', bank officer Kathua tweeted about rape | ‘ती मुलगी मेली हे बरेच झाले’, बँक अधिकाऱ्याचे कथुआ बलात्काराविषयी ट्विट

‘ती मुलगी मेली हे बरेच झाले’, बँक अधिकाऱ्याचे कथुआ बलात्काराविषयी ट्विट

googlenewsNext

तिरुवनंतपुरम : कथुआतील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच, केरळमधील एका बँक अधिका-याने ‘ती मुलगी मेली, हे बरेच झाले. अन्यथा मोठेपणी आत्मघातकी बॉम्ब म्हणून ती भारताविरोधात उभी ठाकली
असती,’ असे ट्विट करून विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन केले. अर्थात, त्यामुळे त्याला ताबडतोब नोकरीतून काढण्यात आले.
कोटक महिंद्र बँकेतील एका असिस्टंट मॅनेजरचे हे ट्विट सोशल मीडियात प्रसारित होताच, लोक अतिशय चिडले. त्याला नोकरीतून काढा, अन्यथा आम्ही आपल्या बँकेतील खाती बंद करू, असा इशाराच अनेकांनी दिला. त्यामुळे त्याला काढण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासनाने घेतलो.
विष्णू नंदकुमार या अधिका-याने हे ट्विट केले होते. त्याला नोकरीतून काढण्यात येत आहे, असे बँकेने लगेच जाहीरही केले. या निर्णयानंतर बँकेचे कौतुकही सुरू झाले. हा अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाशी संबंधित स्थानिक नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)

फास्ट ट्रॅक कोेर्टात खटला चालवा
कथुआ प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी ते फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी विनंती त्यांनी मुख्य न्यायाधीशांना केली आहे. आरोपींचे समर्थन करणा-या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना दिले होते. ते राजीनामे मुफ्ती यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले.

Web Title: 'The girl got killed so much', bank officer Kathua tweeted about rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.