राजीव गांधींचा 'भारतरत्न' परत घ्या! आपकडून दिल्लीत प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:09 PM2018-12-21T21:09:52+5:302018-12-21T21:12:53+5:30

शीख दंगलीवरून काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

Get back Rajiv Gandhi's 'Bharat Ratna'! Approved the proposal from AAP in Delhi | राजीव गांधींचा 'भारतरत्न' परत घ्या! आपकडून दिल्लीत प्रस्ताव मंजूर

राजीव गांधींचा 'भारतरत्न' परत घ्या! आपकडून दिल्लीत प्रस्ताव मंजूर

googlenewsNext

नवी दिल्ली : 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीवरून दिल्ली आणि पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले असून दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 


शीख दंगलीवरून काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तसेच 31 जानेवारीपर्यंत मुभा देण्याची मागणीही त्यांनी केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये सज्जन कुमार यांचा हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 




यामुळे दिल्ली विधानसभेमध्ये सत्तेत असणाऱ्या आपने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ही खेळी केली आहे. आपने विधानसभेमध्ये राजीव गांधी यांच्यामुळे शीख दंगल उसळली होती. यामुळे ते या दंगलीला जबाबदार होते. यामुळे त्यांना देण्यात आलेला  देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न काढून घेण्यात यावा, असा प्रस्ताव आपने आज मांडला होता. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. 

Web Title: Get back Rajiv Gandhi's 'Bharat Ratna'! Approved the proposal from AAP in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.