लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शहीद जवान औरंगजेबच्या कुटुंबीयांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 03:19 PM2018-06-18T15:19:55+5:302018-06-18T15:19:55+5:30

अपहरण करून दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या करण्यात आली.

General Bipin Rawat meets Aurangzeb’s family members | लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शहीद जवान औरंगजेबच्या कुटुंबीयांची घेतली भेट

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शहीद जवान औरंगजेबच्या कुटुंबीयांची घेतली भेट

googlenewsNext

श्रीनगर- लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शहीद जवान औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बिपीन रावत यांनी जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील शहीद औरंगजेब यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. ईद साजरी करण्यासाठी ते सुट्टी घेऊन घरी निघाली होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथून त्यांचं अपहरण केलं. अपहरण करून दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या करण्यात आली. औरंगजेब हे लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान होते. 

याशिवाय तेथे शुजात बुखारी नावाच्या एका पत्रकाराची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांचा काश्मीरसह देशातील इतर ठिकाणांहूनही निषेध केला जातो आहे. औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ आणि भावाने केंद्र सरकारला या दहशतवाद्यांचा खात्मा करून मुलाचा बदला घेण्याची मागणी केली आहे. तसंच दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला 72 तासांचा अल्टिमेटमही दिला होता. 72 तासात केंद्र सरकारने कारवाई केली नाही, तर मुलाच्या हत्येचा बदला स्वतः घेणार असल्याचं ते म्हणाले होते. 

लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचं ते सुट्टीसाठी घरी येत असताना दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली. हिज्बुलचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घालणाऱ्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होते. 

Web Title: General Bipin Rawat meets Aurangzeb’s family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.