काश्मीरवरुन गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना चांगलंच सुनावलं, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:39 PM2018-10-13T13:39:02+5:302018-10-13T13:41:45+5:30

गौतम गंभीरच्या ट्विटरला रिप्लाय करताना ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लक्ष्य केलं आहे. या व्यक्तीला (गंभीरला) मन्नानच्या घरचा जिल्हाही माहित नसेल.

Gautam Gambhir told Omar Abdullah well, then ... | काश्मीरवरुन गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना चांगलंच सुनावलं, त्यानंतर...

काश्मीरवरुन गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना चांगलंच सुनावलं, त्यानंतर...

Next

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरच्या हंदवाडा एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेला दहशतवादी मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक ट्विटरयुद्ध रंगले आहे. गंभीरने ओमर अब्दुल्ला व जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना मेंशन करुन ट्विट केले होते. त्यामध्ये, तुमच्यामुळेच एक युवक पुस्तकांपासून भरकटत गोळी चालवण्यास हतबल झाला. आपण एक दहशतवादी, एका कट्टर समर्थकास ठार केलं, असे गंभीरने म्हटले होते. 

गौतम गंभीरच्या ट्विटरला रिप्लाय करताना ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लक्ष्य केलं आहे. या व्यक्तीला (गंभीरला) मन्नानच्या घरचा जिल्हाही माहित नसेल. पण, काश्मीरमधील एक तरुण कशाप्रकारे बंदुक हातात घेतो, याबाबत ते भाष्य करत आहेत. गंभीरला काश्मीरबाबतीत तेवढचं माहित आहे, जेवढं मला क्रिकेटबाबतीत समजतं. मात्र, मला क्रिकेट संदर्भात काहीच माहित नसल्याचा टोलाही ओमर अब्दुल्ला यांनी गंभीरला लगावला आहे. त्यानंतर, गौतमनेही या ट्विटची गंभीर दखल घेत, तुम्ही तर नकाशाच्या बाता मारूच नका, काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशासोबत जोडण्यासाठी तुम्हीच अधिक कष्ट घेतले आहे. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी काश्मीरमधील तरुणांसाठी काय केलं ? तुम्हीच सांगा असा प्रश्नही गंभीरने विचारला आहे. त्यावर पुन्हा अब्दुल्ला यांनी गंभीरला टार्गेट केलं. मी तुमच्यासोबत वाद घालू इच्छित नाही, ज्यांना राष्ट्रवाद आणि बलिदान माहित नाही, त्यांच्याशी मला चर्चा करायची नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले. 



 



 

Web Title: Gautam Gambhir told Omar Abdullah well, then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.