गौतम गंभीर शहीदांच्या घरी! शिक्षणाचा खर्च उचलल्यानंतर आता मॅच पाहायला येण्याचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:37 AM2018-04-28T10:37:30+5:302018-04-28T10:37:30+5:30

जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलीचे अश्रू पाहून हेलावल्या गंभीरने तिच्याही शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.

gautam gambhir meet family members of martyrs invite to watch ipl | गौतम गंभीर शहीदांच्या घरी! शिक्षणाचा खर्च उचलल्यानंतर आता मॅच पाहायला येण्याचं निमंत्रण

गौतम गंभीर शहीदांच्या घरी! शिक्षणाचा खर्च उचलल्यानंतर आता मॅच पाहायला येण्याचं निमंत्रण

googlenewsNext

नवी दिल्ली- टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या सामाजिक बांधिलकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांच्या मुलाचा खर्च उचलला आहे. तसंच जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलीचे अश्रू पाहून हेलावल्या गंभीरने तिच्याही शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.

आता गौतम गंभीरने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर गंभीरने शहीदांच्या मुलांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

गौतम गंभीरने छत्तीसगडमधील सुकमा आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या काही जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गंभीरने शहीद जवानांच्या मुलांशी गप्पा मारल्या.तसंच आयपीएलचे सामने पाहायला येण्याचं आमंत्रणही दिलं.

गौतम गंभीर त्याच्या संस्थेमार्फत शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत आहे. जोपर्यंत त्यांना शिकायचं आहे, तोपर्यंत गंभीर त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. सध्या गंभीरची संस्था 12 कुटुंबातील 18 मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत आहे. नक्षलवाद्यांनी सुकमात केलेल्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते, त्यानंतर गंभीरने संस्था सुरु करुन, शहिदांच्या मुलांना मदतीचा हात दिला.
 

Web Title: gautam gambhir meet family members of martyrs invite to watch ipl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.