Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:09 AM2018-09-17T11:09:02+5:302018-09-17T12:49:30+5:30

Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

Fuel Hike : If govt allows, I can sell petrol, diesel for Rs 35-40 per litre, says Baba Ramdev | Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

Next

नवी दिल्ली - दररोज वाढणाऱ्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

''सरकारनं परवानगी दिली तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल-डिझेल विकेन, करामध्ये सवलत देईन'', असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.  'लोकसभा निवडणूक 2019पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कपात करावी लागेल. नाही तर सरकारलाच ही महागाई खूप महागात पडेल',  भाजपा सरकारला सूचना देण्याचाही यावेळेस त्यांनी प्रयत्न केला. तर दुसरीकडे, मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करू शकते, ही बाबदेखील बाबा रामदेव यांनी यावेळेस मान्य केली. शिवाय, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या 28 टक्क्यांपेक्षा कमी कर प्रणाली अंतर्गत आणले गेले पाहिजे, असेही ते म्हणालेत.

(48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर)

एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यादरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्यास सरकारकडे पैसे कुठून येणार?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं की, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, अशा व्यक्तींवर आणखी कर लादावा. 

(मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले)

महागाईवर मोदी सरकारवर निशाणा साधत असतानाच बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदींच्या विकासकामांचंही कौतुक केले. 
ते म्हणाले की, ''पंतप्रधान मोदींवर टीका करणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. मात्र मोदींनी चांगली कामंदेखील केली आहे. त्यांनी क्लिन इंडिया मिशन लाँच केले. त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा घोटाळा झालेला नाही. दरम्यान, सध्या काही राजकीय मंडळी राफेल विमान डीलवरुन प्रश्न उपस्थित करत आहेत''. 

मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणांचे, निर्णयांचे जोरदार समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनीही इंधन दरवाढीच्या समस्येवरुन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

दरम्यान, दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. या समस्येवर ''कुठे आहेत अच्छे दिन?'', असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

Web Title: Fuel Hike : If govt allows, I can sell petrol, diesel for Rs 35-40 per litre, says Baba Ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.