Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:56 PM2018-08-16T20:56:20+5:302018-08-17T19:43:58+5:30

Atal Bihari Vajpayee Funeral: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला.

former prime minister Atal Bihari Vajpayee Final Journey Live Updates | Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

googlenewsNext

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला. 

राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, लालकृष्ण आडवाणी, अमित शहा आणि तिन्ही सेनादल प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच, त्यांना 300 जवानांनी अखेरची मानवंदना दिली. अनेक पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनानं संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरात सात दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या अस्थिंचे विसर्जन १९ ऑगस्ट रोजी हरिद्वार येथे करण्यात येणार असल्याचे समजते.


Live Updates: 

- अटलबिहारी वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला.




- अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाभोवती लपेटलेला तिरंगा नात निहारीकाकडे सोपविण्यात आला.


- लालकृष्ण आडवाणी आणि अमित शहा यांनी वाजपेयींना अखेरची मानवंदना दिली. यावेळी दोघेही भावूक झाले.   


- माजी पंतप्रधान मनमोहनसिंह आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. 



- वाजपेयी यांना अखेरची मानवंदना देताना राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद.


- तिन्ही सेनादलांकडून अटलजींना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

- अटलबिहारी वाजपेयींना 300 जवानांनी मानवंदना दिली
- राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृतिस्थळाजवळ होणार अंत्यसंस्कार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेत सहभागी
- नरेंद्र मोदी, अमित शाह अंत्ययात्रेत पायी सहभागी
- अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत भाजपाचे दिग्गज नेते सहभागी
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंंत्री मनीष सिसोदिया, आपचे खासदार संजय सिंह यांनी भाजपा मुख्यालयात जाऊन अटलजींना वाहिली श्रद्धांजली..


भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपा मुख्यालयात दाखल







भाजपा मुख्यालयाबाहेर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात दाखल
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी अटल बिहारी वाजपेयींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अटलजींच्या घरी जाऊन वाहिली श्रद्धांजली


Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने देश शोकसागरात!
Atal Bihari Vajpayee : अटलपर्वाचा अस्त! आज होणार अंत्यसंस्कार

 

जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली


केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम आणि तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी अटलजींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली

अटलबिहारी वाजपेयींचं पार्थिव शरीर भाजपा मुख्यालयात घेऊन जाणा-या ट्रकना फुलांनी सजवण्यात आलं आहे.  





- वाजपेयी यांच्या निधनानं उपखंडातील दिग्गज नेता हरपला. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती- इम्रान खान, पाकिस्तानचे आगामी पंतप्रधान

- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी घेतलं वाजपेयींचं अंत्यदर्शन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन





- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक





- भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी घेतलं वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन



- दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयं उद्या बंद राहणार; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती
- वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचल्या
- उद्या सकाळी 9 वाजता वाजपेयींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपा कार्यालयात ठेवणार
- उद्या दुपारी 1 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार



- उद्या संध्याकाळी 4 वाजता वाजपेयींच्या पार्थिवावर स्मृती स्थळ येथे होणार अंत्यसंस्कार
- ओदिशा सरकारकडून दुखवटा जाहीर; उद्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयं बंद राहणार


- वाजपेयींच्या निधनानं देशानं एक महान नेता गमावला- भाजपा अध्यक्ष अमित शहा
- भाजपानं पहिला राष्ट्रीय अध्यक्ष, कोट्यवधी तरुणांनी प्रेरणा देणारं व्यक्तीमत्त्व गमावलं- अमित शहा




Web Title: former prime minister Atal Bihari Vajpayee Final Journey Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.