मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो- डॉ. मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:18 AM2018-12-19T08:18:29+5:302018-12-19T08:35:19+5:30

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

former pm manmohan singh press conference media narendra modi | मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो- डॉ. मनमोहन सिंग

मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो- डॉ. मनमोहन सिंग

Next
ठळक मुद्देमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलामी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो.मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे. मी परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर नेहमीच पत्रकार परिषद घेत होतो, असंही मनमोहन सिंग म्हणाले आहेत.

मी फक्त एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हतो, तर देशाचा एक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टरही होतो.  ‘चेंजिंग इंडिया’या कार्यक्रमात सहभागी होत मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयचा संबंध हा पती-पत्नीसारखा आहे. दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ बसेल अशा पद्धतीनं विचारांचं समाधान शोधलं पाहिजे. विशेष म्हणजे केंद्राचा आरबीआयच्या पैशावर डोळा असतानाच मनमोहन सिंग यांनी हे विधान केलं आहे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये झालेल्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनीही गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आरबीआयचं गव्हर्नरपदही भूषवलं होतं. मनमोहन सिंग म्हणाले, आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. तसेच केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये पती-पत्नीसारखं नातं पाहिजे. मतभेद असू शकतात, परंतु त्याचं समाधान दोन्ही संस्थांनी सामंजस्यपद्धतीनं शोधलं पाहिजे. तसेच शक्तिकांत दास यांनाही आरबीआय गव्हर्नरपदाचा मनमोहन सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  

Web Title: former pm manmohan singh press conference media narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.