VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 03:06 PM2018-12-17T15:06:06+5:302018-12-17T20:38:52+5:30

मध्य प्रदेशमध्ये शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी दृश्य

Former CM Shivraj Singh Chouhan attends swearing in ceremony of Kamal Nath and Jyotiraditya Scindia in Bhopal | VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

Next

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  मात्र या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि सिंधिया यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर याच सोहळ्याच हिंदुस्तानचं हृदय समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला.

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभं केलं. त्यांचे हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केलं. त्यामुळे अनेकांना मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाची 'हिंदुस्तान का दिल देखो' ही टॅगलाईन आठवली. या सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातील नेत्यांच्या मनाची उदारता पाहायला मिळाली.




निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आला आणि तब्बल दीड दशकांपासून भाजपाच्या ताब्यात असलेलं मध्य प्रदेश काँग्रेसकडे गेलं. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी तीनही राज्यातील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. निवडणुकीत हारजीत होतच असते. मात्र या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या विकासात जे योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी तिन्ही नेत्यांना धन्यवाद दिले होते. 

Web Title: Former CM Shivraj Singh Chouhan attends swearing in ceremony of Kamal Nath and Jyotiraditya Scindia in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.