माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 2:12am

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. खोब्रागडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. बेस्टचे महासंचालक म्हणून खोब्रागडे यांची कारकीर्द वादळी ठरली होती. किंगलाँग बसेसची खरेदी करण्यासह त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. भारतीय परराष्टÑ सेवेत असलेली त्यांची कन्या देवयानी खोब्रागडे यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता. किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता. गजभिये यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. ते विविध सामाजिक संस्थांशी जुळले आहेत.

संबंधित

चतुर्वेदी समर्थक  येणार का देवडियात ?
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून
चतुर्वेदी समर्थकांनी शोधला पटोलेंमध्ये आधार
नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य
राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 58 जागांसाठी 23 मार्चला होणार मतदान

राष्ट्रीय कडून आणखी

बिहारमध्ये भरधाव बोलेरो शाळेत घुसली, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू
....एक दिवस पाकिस्तानला पराभव मान्य करावाच लागेल- हंसराज अहिर
आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना- नारायण राणे
त्रिपुरा निवडणूक- भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची केली हत्या
आणखी एका बँकेत महाघोटाळा, हिरे व्यापाऱ्यानं केला 390 कोटींचा गोलमाल

आणखी वाचा