मेगा भरती... फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:38 AM2018-10-29T10:38:23+5:302018-10-29T11:05:40+5:30

फेस्टिव्ह सिझनसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन 1 लाख 20 हजार नोकऱ्या देण्याची शक्यता आहे. या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे.

flipkart and amazon will fare up to 120000 people in the festive season | मेगा भरती... फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या

मेगा भरती... फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या

Next

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून सणांचा मुहूर्त साधत ग्राहकांसाठी सेलचं आयोजन करण्यात येत असतं. मात्र आता फेस्टिव्ह सिझनसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन 1 लाख 20 हजार नोकऱ्या देण्याची शक्यता आहे. या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे.

Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्टवर पुन्हा फेस्टिव्ह धमाका; 80 टक्क्यांपर्यंत सूट  

दिवाळीत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तर्ता करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल 1 लाख 20 हजार नव्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाऊ शकतात. नोकरदार कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होऊ शकते असेही काहींनी म्हटले आहे. यंदा खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने  खास ऑफर्ससोबतच लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी सेवेतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. `हे. फ्लिपकार्टनंतर अॅमेझॉननेही आता ग्राहक सुविधेवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. 
 

Web Title: flipkart and amazon will fare up to 120000 people in the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.