काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:16 AM2018-09-14T01:16:06+5:302018-09-14T01:16:45+5:30

ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे.

Five militants killed in Kashmir; More than 24 security personnel were injured including the Deputy Superintendent of Police | काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

Next

- सुरेश डुग्गर 

जम्मू : जम्मू-काश्मिरात गेल्या १२ तासांत झालेल्या तीन चकमकीत ८ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून, या चकमकीत पोलीस उपअधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी ठार झाले आहेत. यात अनेक सुरक्षारक्षक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एक दिवसापूर्वीच या अतिरेक्यांनी पोलीस दलावर गोळीबार केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. अधिकाºयांनी सांगितले की, तपास मोहिमेदरम्यान सुरक्षा दल जिल्ह्याच्या ककरियाल भागात एका घराजवळ पोहोचले आणि अतिरेक्यांना घेरले. त्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दलात सीआरपीएफ, पोलीस आणि सैन्याचे जवानही सहभागी होते.
जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांना शोधण्यासाठी बुधवारी तपास मोेहीम सुरू केली होती. यात ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. या अतिरेक्यांचे वय १८ ते २२ च्या दरम्यान आहे.
पोलिसांनी सांगितले की, या चकमकीत ३ अतिरेकी मारले गेले असून, पोलीस उपाधीक्षक मोहनलालसह आठ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सीआरपीएफचे जवान आणि तीन पोलिसांचा समावेश आहे. जखमींना कटराच्या नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अधिकाºयांनी सांगितले की, अतिरेक्यांनी बुधवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. त्यानंतर अतिरेक्यांना पकडण्यासाठी जम्मू आणि रियासी जिल्ह्यात झज्जर कोटली वन क्षेत्रात मोहीम सुरू करण्यात आली.
कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये तीन अतिरक्यांना ठार मारण्यात जवानांनी यश मिळविले आहे.

बिस्कीट खाऊन पळाले
तपास मोहीम सुरू असताना अतिरेकी ककरियालच्या जंगलात पळून गेले होते. ग्रामीण भागातील एका रहिवाशाने सांगितले की, तीन जण रात्री आठच्या सुमारास आले आणि कपडे व जेवण मागितले.
त्यांनी बिस्कीट खाल्ले, पाणी पिले आणि रात्री ९.१० वाजता निघून गेले.
अतिरेक्यांनी वाहनाची मागणी केली; पण आमच्याकडे कोणतेच वाहन नाही, असे या ग्रामस्थाने सांगितले.
या अतिरेक्यांनी त्या ग्रामस्थाला आपला मोबाईल फोन बंद करण्यास सांगितले होते. हे अतिरेकी येथून निघून जाताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याची सूचना दिली.

सोपोरमध्ये ‘जैैश’च्या दोघांना टिपले
उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी गुरुवारी जैश-ए-मोहंमदच्या दोन अतिरेक्यांना चकमकीत ठार मारले. मृतांत अली या टोपणनावाचा खूप जुना अतिरेकीही आहे.
सोपोर येथे गुरुवारी पहाटे सुरक्षा दले आणि पोलिसांनी चिणकीपोरा भागाला घेरले. या भागात जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना तेथे तैनात करण्यात आले.
अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला व चकमक सुरू झाली. त्यात पाकिस्तानचे अली ऊर्फ अथहर आणि झिया-ऊर-रहमान मारले गेले, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश आहे.
२०१४ मध्ये अली काश्मीर खोºयात शिरला होता. त्याचा उत्तर काश्मीरमध्ये नागरिकांना ठार मारण्यात व सुरक्षा दलांवर हल्ले व दूरनियंत्रकांद्वारे स्फोट घडवून आणण्यात हात होता.
यावर्षी जानेवारी महिन्यात त्याने दूरनियंत्रकाद्वारे घडवून आणलेल्या स्फोटात चार पोलीस ठार झाले होते.

Web Title: Five militants killed in Kashmir; More than 24 security personnel were injured including the Deputy Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.