जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 01:45 PM2019-02-17T13:45:57+5:302019-02-17T14:35:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे.

The fire that is on your mind, it is in my mind too - Narendra Modi | जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी  

जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी  

ठळक मुद्देपुलवामा येथील तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहेजी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्या मनातही आहे

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्या मनातही आहे.''  असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर होते. तेथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन केल्यानंतर  मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी मोदींनी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना श्रद्धांजली वाहिली.'' पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पाटणा येथील जवान संजयकुमार सिन्हा आणि भागलपूर येथील जवान रतनकुमार ठाकूर यांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. पुलवामा येथील हल्यानंतर  तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्या मनातही आहे.'' 


 आज बिहार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा येथील शहरी विभागात 3 हजार 200 चौ.कि.मी. परिसरातील 9.75 लाख कुटुंबांना पीएनजी आणि वाहनांना सीएनजी पुरवणाऱ्या प्रकल्पाचे उद्धाटन केले. तसेच सुलतानगंज आणि नवगछिया येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उदघाटन केले. 

Web Title: The fire that is on your mind, it is in my mind too - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.