पाचवा टप्पा : पश्चिम बंगालमध्ये ७४ टक्के, काश्मीरमध्ये फक्त ३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:52 AM2019-05-07T07:52:50+5:302019-05-07T07:53:10+5:30

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व ५१ ठिकाणी शांततेत मतदान पार पडले.

Fifth phase: 74 per cent in West Bengal, and only 3 per cent in Kashmir | पाचवा टप्पा : पश्चिम बंगालमध्ये ७४ टक्के, काश्मीरमध्ये फक्त ३ टक्के

पाचवा टप्पा : पश्चिम बंगालमध्ये ७४ टक्के, काश्मीरमध्ये फक्त ३ टक्के

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व ५१ ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. याही टप्प्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या वा ती नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. या टप्प्यात बंगालमध्ये ७४ टक्के, तर अनंतनागमध्ये ३ टक्के मतदान झाले.

या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राम विलास पासवान, स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, राज्यवर्धन राठोड या सत्ताधारी नेत्यांचे तसेच यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सुबोधकांत सहाय, आचार्य प्रमोद कृष्णम व समाजवादी पक्षाच्या पूनम सिन्हा यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
काश्मीरच्या लेह मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले, तर झारखंड व मध्य प्रदेशमध्ये ६४ टक्के, राजस्थानात ६३ टक्के मतदारांनी आपला अधिकार बजावला. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मात्र तुलनेने खूपच कमी म्हणजे अनुक्रमे ५८ व ५0 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प. बंगालच्या बराकपोरमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तेथील बराकपोरमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तेथील मतदान केंद्र तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करीत, तिथे फेरमतदानाची मागणी भाजपने केली. मात्र भाजप उमेदवार अर्जुन सिंह यांनी मतदान केंद्रात घुसून मतदारांना मते देण्यापासून अडवले आणि त्यामुळे ते व स्थानिक मतदार यांच्यात बाचाबाची झाली, असा दावा तृणमूलने केला आहे. अमेठी मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथ कॅप्चर केल्याचा आरोप उमेदवार स्मृती इराणी यांनी केला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी असे घडले नसल्याचे सांगितले.
अनंतनाग मतदारसंघात तिसºया टप्प्यातील मतदानातही लोकांत उत्साह नव्हता. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक केली, तर एका मतदान केंद्रापाशी ग्रेनेड फेकण्यात आला. त्याच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तेथील काही मतदान केंद्रांवर एक ते तीन मतदारांनीच आपला हक्क बजावला.

पाचव्या टप्प्यात आतापर्यंत सर्वात कमी ६३.५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ६९.५० टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले तर दुसºया टप्प्यात ६९.४४ टक्के मतदान झाले. तिसºया टप्प्यात ६८.४० आणि चौथ्या टप्प्यात ६५.५१ टक्के मतदान
झाले.

मला अटक करून दाखवा - मोदी

पश्चिम बंगालमध्ये पुढील टप्प्यातही मतदान व्हायचे आहे. तेथील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. त्या कारमधून उतरताच, कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की मी इथे जय श्रीरामची घोषणा देतो. मला ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी अटक करून दाखवावी.
 

Web Title: Fifth phase: 74 per cent in West Bengal, and only 3 per cent in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.