राजस्थानात भयावह प्रकार; तरुणाला जिवंत जाळताना केले शूटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 3:00am

राजस्थानमध्ये राजसमंद येथील एका हॉटेलजवळ निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्याच सुमारास संपूर्ण जिल्ह्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला.

उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद येथील एका हॉटेलजवळ निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्याच सुमारास संपूर्ण जिल्ह्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात एका व्यक्तीला एक माणूस खाली पाडतो, कोयत्याने त्याच्यावर वार करतो आणि मग त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवतो, असे दिसत होते. जो मृतदेह हॉटलपाशी सापडला, त्याची हत्या करणाºयाच्या सहकाºयानेच तो व्हिडीओ तयार केला आणि अनेकांना स्वत:हून पोस्ट केला. त्या व्यक्तीला मारून त्याच्यावर रॉकेल ओतून पेटवून देणारा माणूस अभिमानाने आपण हे केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असून, सर्व जिहादींना आपण अशीच शिक्षा करू, असे तो म्हणत आहे. या प्रकरणाची कोणी तरी तक्रार केली. पण पोलिसांनी त्याची नोंद करण्यास टाळाटाळ केली. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच, त्यांना गुन्हा नोंदवणे भाग पडले. हत्या करणाºया इसमाचे नाव शंभूनाथ असून, तो फरार होता. पण त्याला नंतर अटक करण्यात आली. एकूण आठ जणांना अटक झाली असून, विशेष तपास पथकाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. हत्या करणारा शंभूनाथ कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, हे समजू शकले नाही. प्रत्यक्षात प्रेमाच्या त्रिकोणातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था) हा प्रकार बुधवारी घडला. पोलीस अधीक्षक मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद बट्टा शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या माल्दा जिल्ह्यातील आहे. तो राजस्थानात मजुरी करीत असे.

संबंधित

दुचाकी जळीत प्रकरणातील संशयित मोकाट
नागरे खुनातील  दोन संशयितांना अटक
औरंगाबादेत ८वर्षीय बालिकेवर अत्याचार
महिला पोलिसांशी रिक्षाचालकाने केली गैरवर्तणूक; बोगस पत्रकार असल्याचा देखील दावा 
ठाण्यात दिवसाढवळ्या विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणारे अटकेत 

राष्ट्रीय कडून आणखी

‘त्या झेंड्यांवर बंदी घालावी’
ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला
‘मोदीकेअर’ योजनेत महाराष्ट्र, राजस्थानही
IDBIला LICचा आधार; 51 टक्के समभाग विकत घेण्यास मंजुरी
राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं- पर्रिकर

आणखी वाचा